गेल्या अनेक दिवसांपासून बिटकॉईन स्कॅम प्रकरणी राज कुंद्रा कायदेशीर अडचणीमध्ये होता. परंतु न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अभिनेता वादाच्या भोवऱ्यातून बाहेर आला आहे. मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने दिलेल्या निकालामुळे राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून चौकशी सुरू असलेल्या या प्रकरणात त्याच्यावर 150 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप होता.
advertisement
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बिटकॉइन घोटाळा प्रकरणात शुक्रवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात यापूर्वी राज कुंद्रावर कारवाईचा विचार करण्यात आला होता, परंतु आता अभिनेत्याला मोठी सवलत मिळाली आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान राज कुंद्राने जामीन अर्ज दाखल केला होता. राजची बाजू ऐकल्यानंतर युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज कुंद्रावर या घोटाळ्यात फसवणूक केल्याचा आरोप केला होता. प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर न्यायालयाने अखेर राज कुंद्राला दिलासा देण्यात आला आहे. तथापि, न्यायालयाने असेही म्हटले आहे की, प्रकरणाच्या प्राथमिक तपासणीत मिळालेल्या पुराव्यांनुसार असे आढळले आहे की, राज कुंद्रा विरोधात कोणताही गुन्हा समोर आला नाही. या प्रकरणात आणखी कोण सामील आहे का? याचाही सध्या तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज कुंद्रा संबंधित बिटकॉइन फसवणुकीच्या प्रकरणात, वकील प्रशांत यांनी सांगितले की राज कुंद्रा 2021 पासून या प्रकरणात पोलिसांना आणि वकिलांना माहितीसाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. सर्व संबंधित कागदपत्रे सादर केली गेली आहेत आणि सध्या त्यांना ताब्यात घेण्याचे कोणतेही वैध कारण नाही. वकीलाने ईडीवर डेटामध्ये छेडछाड केल्याचा आरोपही केला होता. वकिलाच्या मते, शिक्षा किंवा वसुली सध्याच्या परिस्थितीवर नाही तर, खरेदी केलेल्या किंमतीवरच व्हायला हवी. 2017 मध्ये कुंद्रा यांना 285 बिटकॉइन मिळाले, ज्यांची किंमत त्यावेळी ₹6.6 कोटी इतकी होती. तथापि, एजन्सीने जाणूनबुजून 16 एप्रिल 2024 ही तारीख निवडली, तेव्हा एका बिटकॉइनची किंमत 52 लाख इतकी होती, ज्याची एकूण किंमत 150 कोटी इतकी झाली होती. वकिलाच्या मते, बाजारातील चढउतारांमध्ये अशी फेरफार करणे अन्याय्य आहे.
