TRENDING:

पाय गमावला पण Cricket सोडलं नाही! व्हिलचेअरवर मॅच खेळणाऱ्या क्रिकेटवेड्या ओंकारची गोष्ट!

Last Updated:

2021 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातात उजवा पाय गमावला, तरीही खचून न जाता त्यांनी नव्या उमेदीनं आयुष्याला सामोरं जात आज महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मनामध्ये कुठलीही गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर कोणतीही अडचण अडथळा ठरत नाही, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यातील ओंकार रौंदाळे. 2021 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातात उजवा पाय गमावला, तरीही खचून न जाता त्यांनी नव्या उमेदीनं आयुष्याला सामोरं जात आज महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
advertisement

ओंकार यांना लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. ते नियमितपणे चालत, धावत आणि मैदानी क्रिकेट खेळत असत. क्रिकेटसाठी असलेले त्यांचे वेड आणि पॅशन हेच त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. मात्र 2021 मध्ये झालेल्या कार अपघाताने त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला. या अपघातात त्यांचा उजवा पाय गमवावा लागला. त्या क्षणी सर्व काही संपल्यासारखे वाटले. माझं क्रिकेट आता संपलं, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती.

advertisement

Success Story : 10 गुंठ्यात करून दाखवलं, वांग्याची शेती ठरली फायद्याची, लाखात कमाई

परंतु मनातील स्वप्न मात्र त्यांनी कधीच मरू दिले नाही. अपघातानंतरही ते स्वतःला मैदानावर क्रिकेट खेळताना पाहायचे. एका पायावर राष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न ते मनात बाळगत होते. त्यानंतर त्यांना कळले की दिव्यांगांसाठीही क्रिकेटचे विविध प्रकार आयोजित केले जातात. Differently Abled Cricket Council of India (DCCI) मार्फत ब्लाइंड, फिजिकली चॅलेंज्ड आणि व्हीलचेअर क्रिकेट अशा विविध गटांसाठी स्पर्धा घेतल्या जातात.

advertisement

View More

मुंबईच्या व्हीलचेअर क्रिकेट संघाशी संपर्क साधून ओंकार यांनी सराव आणि सामने खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल Wheelchair Cricket India आणि DCCI यांनी घेतली. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रासाठी व्हीलचेअर क्रिकेट संघ उभारण्याची जबाबदारी देण्यात आली. अपघाताला केवळ दोन वर्षे झाली असताना आणि वयानेही तुलनेने तरुण असताना ही मोठी जबाबदारी स्वीकारणे सोपे नव्हते. तरीही त्यांनी धाडसाने हे आव्हान स्वीकारले.

advertisement

व्हीलचेअर क्रिकेटसाठी वापरली जाणारी स्पोर्ट्स व्हीलचेअर ही विशेष प्रकारची, हलकी आणि जलद हालचाल करण्यास योग्य असते. सुरुवातीला अशी व्हीलचेअर त्यांच्याकडे नव्हती. आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर आव्हाने होती. मात्र 2023 पासून त्यांच्या या नव्या प्रवासाला खरी गती मिळाली.

अपघातानंतर घरच्यांवर मोठा मानसिक आघात झाला. ज्यांच्यासोबत ते कायम फिरायचे, ते काही मित्रदेखील भेटायला आले नाहीत. अशा कठीण काळात त्यांच्या आयुष्यात ठामपणे उभी राहिली ती वर्षा. त्या वेळी दोघांचे लग्न झाले नव्हते. ते दोघे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात होते आणि एकत्र पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याचे स्वप्न पाहत होते. अपघातानंतर सर्वच अनिश्चित झाले होते. तरीही वर्षा यांनी खंबीर साथ देत ओंकार यांच्यासोबत विवाह केला आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना आधार दिला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनं वापरताना हा असतो मोठा धोका, एक्सपर्टचा महत्त्वाचा सल्ला
सर्व पहा

आज ओंकार रौंदाळे हे पॅथॉलॉजी लॅब आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात व्यवसाय करत आहेत. कुटुंबियांचा पाठिंबा, पत्नीची साथ आणि स्वतःची जिद्द यामुळे त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटावर मात केली आहे. मनात इच्छा आणि जिद्द असेल, तर कोणतीही परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही, असे ते ठामपणे सांगतात. ओंकार यांचा प्रवास केवळ क्रीडाक्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येकाला संकटावर मात करण्याची प्रेरणा देणारा आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाय गमावला पण Cricket सोडलं नाही! व्हिलचेअरवर मॅच खेळणाऱ्या क्रिकेटवेड्या ओंकारची गोष्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल