advertisement

Success Story : 10 गुंठ्यात करून दाखवलं, वांग्याची शेती ठरली फायद्याची, लाखात कमाई

Last Updated:

आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या शेतकऱ्याकडे एकूण चार एकर शेती असली तरी त्यांनी प्रत्येक 10 गुंठ्यात वेगवेगळी पिके घेऊन उत्पन्न वाढवले आहे.

+
कमी

कमी खर्च, सेंद्रिय जोड आणि लाखांचा नफा; सोलापूरच्या ज्ञानेश्वरांची 'वांगी' जोरात

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कोरवली गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी कमी क्षेत्रातून अधिक नफा कसा मिळवावा हे सिद्ध करून दाखवले. केवळ 10 गुंठ्यांमध्ये सेंद्रिय पद्धतीने वांग्याची लागवड करून त्यांना आठ महिन्यात साडेतीन लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या शेतकऱ्याकडे एकूण चार एकर शेती असली तरी त्यांनी प्रत्येक 10 गुंठ्यात वेगवेगळी पिके घेऊन उत्पन्न वाढवले आहे.
15 डिसेंबरला सुरू केलेल्या या लागवडीसाठी 10 गुंठ्याना फक्त 20 हजार रुपयांचा खर्च आला. यात 800 वांग्याच्या रोपांची लागवड केली. पहिल्या तोडणीतच एक क्विंटल वांगा निघून 80 हजार रुपयांचा नफा मिळाला. आठ महिने चालणाऱ्या या तोडणीत एकूण खर्च वजा करून 3 ते 3.50 लाखांचा नफा अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर बाजारऐवजी सोलापूर जिल्ह्यातील गावांतील आठवडी बाजारात विक्री करतात, ज्यामुळे दुप्पट नफा मिळतो.
advertisement
कमी क्षेत्रातही योग्य नियोजनाने शेती फायदेशीर होऊ शकते, असा त्यांचा सल्ला आहे. सेंद्रिय पद्धतीमुळे रसायनांचा खर्च टाळला गेला आणि बाजारातील मागणी वाढली. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन आणि नफ्याची ही यशोगाथा सोलापूरच्या ग्रामीण भागात चर्चेत आहे. ज्ञानेश्वर म्हणाले, शिक्षण कमी असले तरी शेतीचे ज्ञान आणि मेहनत महत्त्वाची. त्यांच्या यशाने स्थानिक शेतकरी उत्साहित झाले असून, सेंद्रिय शेतीचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 10 गुंठ्यात करून दाखवलं, वांग्याची शेती ठरली फायद्याची, लाखात कमाई
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement