advertisement

काळजाचा ठोका चुकला! अमेरिकेची विध्वंसक विमाने एअरबेसवरून रवाना, पुढील काही तासात इराणवर सर्वात भीषण हल्ला

Last Updated:

US Air Force: ब्रिटनमधील एअरबेसवरून अमेरिकेच्या B-52 Stratofortress बॉम्बर्सच्या उड्डाणामुळे जागतिक तणावात मोठी वाढ झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “मोठ्या कारवाई”च्या इशाऱ्यानंतर संभाव्य हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News18
News18
वॉशिंग्टन/लंडन: अमेरिकेच्या B-52 Stratofortress बॉम्बर्सनी ब्रिटनमधील एअरबेसवरून उड्डाण घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. या अत्याधुनिक आणि विध्वंसक विमानांची हालचाल ही संभाव्य मोठ्या लष्करी कारवाईचा संकेत मानली जात असल्याने आंतरराष्ट्रीय तणाव अधिक वाढला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच “आज रात्री काहीतरी मोठं होणार आहे” असा इशारा दिला होता. त्यानंतर या बॉम्बर्सच्या हालचालीमुळे त्या वक्तव्याला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते अमेरिकेचे लक्ष्य इराणमधील महत्त्वाचे रेल्वे पूल, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वीज प्रकल्प असू शकतात. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
advertisement
माहितीनुसार या मोहिमेसाठी अमेरिकन लष्कराने सर्व तयारी पूर्ण केली असून अंतिम आदेशाची प्रतीक्षा सुरू आहे. जर हा हल्ला झाला तर मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर विनाश होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे केवळ इराणच नव्हे तर संपूर्ण प्रदेशातील सामरिक समीकरणे बदलू शकतात.
advertisement
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले असून ट्रम्प आपल्या इशाऱ्याला प्रत्यक्षात उतरवणार का? याबाबत तीव्र उत्सुकता आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
काळजाचा ठोका चुकला! अमेरिकेची विध्वंसक विमाने एअरबेसवरून रवाना, पुढील काही तासात इराणवर सर्वात भीषण हल्ला
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement