TRENDING:

Video : रश्मिका मंदानाचा 'तो' व्हिडीओ पाहून भडकले बिग बी; थेट केली कारवाईची मागणी

Last Updated:

गुडबाय सिनेमात एकत्र काम करणाऱ्या रश्मिका मंदानाचा व्हायरल व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चन चांगलेच भडकलेत. असं काय आहे त्या व्हिडीओमध्ये?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 06 नोव्हेंबर : अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या बॉलिवूड सिनेमांमुळे चर्चेत आहे. तिच्या कामामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे. पण तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून सगळ्यांची झोप उडाली आहे. हा व्हिडीओ थेट अमिताभ बच्चन यांनी देखील पाहिला आणि तो पाहताच क्षणी अमिताभ बच्चन चांगलेच भडकले आहेत. त्यांनी थेट या व्हिडीओवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमकं काय घडलंय? व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे? पाहूयात.
रश्मिका मंदाना
रश्मिका मंदाना
advertisement

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती लिफ्टमध्ये एंट्री करते. तिनं फार ढिगळे कपडे घातले असून विचित्र पद्धतीनं ती बॉडी फ्लॉंट करताना दिसतेय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करण्यात केलाय. कारण या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी अभिनेत्री रश्मिका मंदाना नसून दूसरीच कोणीतरी आहे. AIच्या माध्यमातून हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

advertisement

हेही वाचा - गुलजार अडूनच बसले, नाही हटवला गाण्यातून 'चड्डी' हा शब्द; लहानांपासून मोठ्यांपर्यंत तूफान हिट झालं गाणं

रश्मिकाचा मॉर्फ केलेला व्हिडीओ बिग बी अमिताभ बच्चन यांनी पाहिला. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. एका ट्विटर वापरकर्त्यानं रश्मिकाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ खोटा असल्याचं सांगितलं आहे. अशा प्रकारे डिपफेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करायला हवी, असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत "हो ही कायदेशीररित्या मजबूत केस आहे", असं म्हटलं आहे. त्यानंतर खरा व्हिडीओ देखील अमिताभ बच्चन यांनी शेअर केला आहे.

advertisement

काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य?

सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा चेहरा मॉर्फ करून व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगी ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. सोशल मीडियावर तिला 415k हून अधिक लोक फॉलो करतात. ही एक ब्रिटीश-इंडियन मुलगी आहे. इन्स्टाग्रामवर ती तिचे अशाप्रकारचे व्हिडीओ सातत्यानं शेअर करत असते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर, अभिनेत्री रणबीर कपूरच्या एनिमल सिनेमा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमा बॉबी देओल आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहे. 1 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Video : रश्मिका मंदानाचा 'तो' व्हिडीओ पाहून भडकले बिग बी; थेट केली कारवाईची मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल