गुलजार अडूनच बसले, नाही हटवला गाण्यातून 'चड्डी' हा शब्द; लहानांपासून मोठ्यांपर्यंत तूफान हिट झालं गाणं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
केवळ लहान मुलंच नाही तर देशभरात हे गाणं हिट झालं आहे. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांची रचना या गाण्याला लाभली आणि ते गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झालं.
मुंबई, 06 नोव्हेंबर : बॉलिवूड सिनेमांप्रमाणे टेलिव्हिजनवरील मालिकांची गाणी देखील अनेक वर्ष प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अनेक गाणी आज लोकांच्या ओठांवर ऐकायला मिळतात. असंच एक गाणं मागील 20हून अधिक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. हे गाणं 1989साली रिलीज झालं होतं. एका टेलिव्हिजन मालिकेचं शीर्षक गीत इतकं हिट होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. लोक आजही ते गाणं गुणगुणताना दिसतात. खास करून लहान मुलं तर त्या गाण्याचे खूप मोठे चाहते आहेत. केवळ लहान मुलंच नाही तर देशभरात हे गाणं हिट झालं आहे. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांची रचना या गाण्याला लाभली आणि ते गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झालं.
1989साी दूरदर्शनवर एक शो सुरू झाला होता. ज्याच दिग्दर्शन Fumio Kurokawa यांनी केलं होतं. Rudyard Kiplingच्या कथेवर ही मालिका आधारित होती. The Jungle Book असं त्या शोचं नावं. नाव ऐकून चेहऱ्यावर लगेच तुमच्याही चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं असेल. 52 भागांची ही मालिका 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्तानं सुरू करण्यात आली होती. मोगली हे या कथेतील प्रमुख पात्र होतं.
advertisement
हेही वाचा - Ankita Lokhande : व्हायचं होतं एअर होस्टेस, झाली अभिनेत्री; बिग बॉस गाजवणारी अंकिता लोखंडे कितवी शिकलीय?
'द जंगल बुक' या मालिकेचं पुढे कार्टून सीरिज, अॅनिमेशन सिनेमांमध्ये देखील रूपांतरण झालं. आता जंगल बुकचं नाव काढल्यानंतर त्यातील एकमेव हिट गाणं म्हणजे ‘जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है…’ मालिकेचं हे भन्नाट टायटल साँग गुलजार यांनी लिहिलं होतं. हे गाणं जेव्हा गुलजार यांनी निर्मित्यांनी म्हणजेच दूरदर्शनला पाठवलं तेव्हा त्यांना गाण्यातील काही शब्द खटकले होते. गाणं खूप छान आहे फक्त गाण्यातून 'चड्डी' हा शब्द काढून टाका असं त्यांनी सांगितलं होतं. पण गुलजार यांनी या गोष्टीला विरोध केला. निर्मात्यांनी अनेकदा त्यांना तो शब्द काढण्यासाठी रिक्वेस्ट केली होती पण गुलजार यांनी 'यह फूल चड्डी में ही खिलेगा', असं सांगितलं होतं. संपूर्ण शो तयार होऊन रिलीजसाठी तयार झाला होता आणि दूरदर्शनकडे नवीन शीर्षक गीत लिहून घेण्याइतका वेळही नव्हता.
advertisement

गुलजार त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याने निर्मात्यांनी अखेर 'द जंगल बुक'चं शीर्षक गीत आहे त्या शब्दात रिलीज करण्याचा निर्णय घेतला. या गाण्याला संगीत विशाल भारद्वाज यांनी दिलं होतं. तर अमोल सचदेव यांनी गाण्याला आवाज दिला होता. गाणं रिलीज झालं आणि काही दिवसात हिट झालं. आजही हे गाणं कमालीचं लोकप्रिय आहे. ‘जंगल जंगल बात चली है…' असा गाण्याच्या पहिल्या काही ओळी ऐकूनच ऐकणारा पुढच्या ओळी स्वत:च म्हणायला लागतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 06, 2023 8:52 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
गुलजार अडूनच बसले, नाही हटवला गाण्यातून 'चड्डी' हा शब्द; लहानांपासून मोठ्यांपर्यंत तूफान हिट झालं गाणं






