TRENDING:

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं गुपचूप लग्न? Wedding Venue चा Video Viral

Last Updated:

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. जरी त्यांनी अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची घोषणा केलेली नसली तरी रिपोर्टनुसार 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमधील एका राजवाड्यात लग्न होईल असं सांगितलं जात होतं, पण आता मात्र सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर ते गुपचूप लग्न करत आहेत की काय? अशी चर्चा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अलीकडेच हे कपल फेब्रुवारीमध्ये राजस्थानमधील उदयपूर इथं लग्न करणार असल्याची माहिती आली होती. आता तर त्यांच्या लग्नाच्या तारखेसंबंधीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात 2 फेब्रुवारीलाच त्यांचं लग्न होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
News18
News18
advertisement

रश्मिका आणि विजय डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची माहिती आहे. उदयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा होणार आहे. इथूनच एका महिलेने व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात सिटी पॅलेसमध्ये तयारी सुरू असल्याचं दाखवलं जातं आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये महिला सांगते, "आम्ही सिटी पॅलेसमध्ये आहोत आणि तिथं खूप सजावट सुरू आहे. आम्ही ऐकलं की इथं लग्न आहे. ते कोणाचं तुम्ही सांगू शकता का?" असा प्रश्न विचारत या महिला हे लग्न रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचंच असल्याचं सांगते. तसंच हे लग्न 2 फेब्रुवारीला होणार असल्याचंही सांगतात.

advertisement

Bigg Boss Marathi 6 च्या घरातील ऑस्ट्रेलिया, टांझानिया आहेत कोण? रितेश भाऊने केली भाऊच्या धक्क्यावर पोलखोल

वृत्तानुसार विजय आणि रश्मिका यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. जरी या जोडप्याने अद्याप अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची घोषणा केलेली नसली तरी हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार त्यांचं लग्न 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमधील एका राजवाड्यात होईल. एका सूत्राने सांगितलं की लग्नात कोणत्याही सेलिब्रिटी पाहुण्यांना आमंत्रित केलं जाणार नाही. त्यांच्या साखरपुड्याप्रमाणे हा समारंभदेखील फक्त त्यांच्या जवळच्या मित्रांमध्येच होईल.

advertisement

रिपोर्ट्सनुसार रश्मिका मंदान्ना फेब्रुवारीमध्ये उदयपूरमध्ये विजय देवरकोंडासोबत लग्न करणार आहे. पण याची अधिकृत माहिती नाही. त्यामुळे हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर ते गुपचूप लग्न उरकत आहेत की काय? अशा चर्चा आहेत. पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत करणारा दावा किती खरा आहे, याबाबत आम्ही सांगू शकत नाही.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाला विचारण्यात आलं की ती पुढील महिन्यात विजयशी लग्न करणार आहे का, ज्यावर तिने उत्तर दिलं, "या अफवा सुरू होऊन चार वर्षे झाली आहेत आणि लोक पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत आहेत. लोक याची वाट पाहत आहेत. पण आजचं सत्य हे आहे की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण स्वतः याबद्दल बोलू"

advertisement

Bigg Boss Marathi 6 च्या घरातील ऑस्ट्रेलिया, टांझानिया आहेत कोण? रितेश भाऊने केली भाऊच्या धक्क्यावर पोलखोल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील काम अंतिम टप्प्यात
सर्व पहा

दरम्यान रश्मिकाने कॉकटेल 2 फिल्मचं शूटिंग पूर्ण केलं आहे. फिल्मचे दिग्दर्शक होमी अदाजानिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली.

मराठी बातम्या/मनोरंजन/
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं गुपचूप लग्न? Wedding Venue चा Video Viral
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल