advertisement

Bigg Boss Marathi 6 च्या घरातील ऑस्ट्रेलिया, टांझानिया आहेत कोण? रितेश भाऊने केली भाऊच्या धक्क्यावर पोलखोल

Last Updated:

बिग बॉसच्या घरातील हे ऑस्ट्रेलिया, टांझानिया आणि ओमन आहेत कोण असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. अखेर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं दोघांच्या कोडवर्डची पोलखोल केली.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरात राडे, भांडणं, आनंद, मजा मस्ती सगळं सुरू आहे. घरात प्रत्येक जण एक वेगळा गेम खेळतोय. अशातच घरातील काही सदस्यांविषयी कोड लाँग्वेजमध्ये बोलताना पाहिलं गेलं होतं. ते दोघे म्हणजे प्राजक्ता शुक्रे आणि करण सोनावणे. करण आणि प्राजक्ता घरातील इतर सदस्यांविषयी बोलताना तोड लाँग्वेजमध्ये बोलताना दिसले. रात्री सगळे झोपलेले असतानाही त्यांचं नव्या नावांवरून डिस्कशन पाहायला मिळालं होतं. त्यांनी घरातील काही सदस्यांना ऑस्ट्रेलिया, टांझानिया आणि ओमन अशी नावं दिली आहेत. आठवडाभर दोघे बोलताना याच नावाने बोलत होते. बिग बॉसच्या घरातील हे ऑस्ट्रेलिया, टांझानिया आणि ओमन आहेत कोण असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. अखेर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं दोघांच्या कोडवर्डची पोलखोल केली.
रितेश म्हणाला, बिग बॉसच्या घरात कोडवर्ड सुरू केलेत. तुम्हाला फनी वाटतंय पण तुमचे कोड वर्ड तुम्हाला सोडून कोणाला कळत नाही. हा गेम आहे, कॅमेरे आहेत तुम्ही काय बोलताय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ऑस्ट्रेलिया टांझानियाबद्दल काय विचार करत आहेत हे कळलं पाहिजे. कोणाला माहिती आहे हे कोण आहेत. महाराष्ट्र विचार करतोय. दोघे एकमेकांबद्दल काय विचार करत आहेत.
advertisement
रितेशनं सांगितलं, ऑस्ट्रेलिया आयुष आहेत. टांझानिया तन्वी आहेत. ओमान ओमकार आहेत. या तिघांना ही नावं प्राजक्ता शुक्रे आणि करण सोनावणे यांनी ठेवली आहेत.
रितेश प्राजक्ता आणि करणला रितेश म्हणाला, तुम्ही कोडवर्डमध्ये बोलत असाल तुमच्यासाठी वेगळं चॅनेल काढावं लागेल. हे बिग बॉसमध्ये दाखवून फायदा कारण ते लोकांना कळणार नाही. ही जी चर्चा आहे बहुतेक मिनिस्ट्री ऑफ एक्सर्टनल अफेअरबरोबरच करावी लागेल. कारण तुम्ही प्रत्येक देशाबरोबर संबंध जोडण्याचा प्रयत्न करताय ते आमच्या डोक्याच्या वरून चाललं."
advertisement
प्राजक्ता म्हणाली, "आम्ही असंही डिस्कस केलं की जे ऑडियन्स आहेत त्यांनी एक लिस्ट बनवली असेल की. कोणाचं नाव आहे."  रितेश म्हणाला, "तुम्ही छान डिस्कस केलंय. पण मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की ऑडियन्सकडे एवढा वेळ नाहीये. त्यांनीही लिस्ट बनवलीये की याला घराबाहेर काढायचं की याला."
"त्याच्यात प्राजक्ता तुम्हाला प्राग नाव, करण तुम्हाला काय?" करण म्हणाला, मी काबुल आहे. रितेश म्हणाला, "करण प्रेक्षक तीनदा म्हणतील काबुल काबुल काबुल आणि तुम्ही घराच्या बाहेर जाल. मस्करीत घेताय ते ठीक आहे. गेम फोर फ्रंटवर या. तुम्ही सातत्याने नॉमिनेट आहेत."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरातील ऑस्ट्रेलिया, टांझानिया आहेत कोण? रितेश भाऊने केली भाऊच्या धक्क्यावर पोलखोल
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement