वयाच्या ८६ वर्षी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. नुकतेच महानायक अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. एवढ्या मोठ्या उद्योगपतीने माझ्याकडून एकदा पैसे उधार घेतले होते, असं सांगत 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये अमिताभ यांनी रतन टाटांच्या आठवणी सांगितल्या.
advertisement
'कौन बनेगा करोडपती'च्या आगामी एपिसोडमध्ये फराह खान आणि बोमन इराणी देखील पाहायला मिळतील. यावेळी इंडस्ट्रीबाबत बिग बी त्यांचे अनुभव सांगतील. रतन टाटा यांच्या निधनावर अमिताभ यांनी दुःख व्यक्त केलं होतं. टाटा यांचे निधन झाल्याचे समजताच अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "एका युगाचा आज अंत झाला. त्यांचा नम्रपणा, दृष्टिकोन आणि कठोर मेहनत कायमच प्रत्येकाला प्रेरणा देईल. खूप दुःख, माझ्या प्रार्थना." रतन टाटा यांचे मृत्युपत्र समोर आले असून, त्यात त्यांची संपत्ती १० हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
2 लाखांची बॅग, एका कार्यक्रमासाठी साडे नऊ लाख, सोशल मीडियावर गाजणाऱ्या जया किशोरी आहेत तरी कोण?
दरम्यान, रतन टाटा यांच्याविषयी बोलताना अमिताभ यांनी सांगितले की, 'ते अतिशय दयाळू होते. त्यांचे मन शुद्ध होते. ते विनम्र होते. ते नेमके कसे व्यक्तिमत्व होते, हे शब्दात सांगणे कठीण आहे. ते खूप साधे होते.'
बच्चन यांनी सांगितले की, "एकदा विमान प्रवासात आमची भेट झाली. आम्ही दोघं एकाच विमानातून प्रवास करत होतो. आम्ही दोघं लंडनमधील हिथ्रो विमानतळावर उतरलो. पण विमानतळावर जे लोक त्यांना न्यायला आले होते, ते काही कारणांमुळे निघून गेले. त्यामुळे टाटा बाजूला उभे असल्याचे मी पाहिले. मग ते कोणाला तरी कॉल करण्यासाठी फोन बूथवर गेले. थोड्या वेळाने ते परत आले आणि त्यांनी मला विचारले की, अमिताभ, माझ्याकडे फोन करायला पैसे नाहीत, त्यामुळे तुमच्याकडून काही पैसे उधार मिळतील का? यावेळी सुरुवातीला मी त्यांना ओळखू शकलो नाही. पण नम्र राहायला हवे असे त्या दिवशी या महान माणसाने शिकवले."