2 लाखांची बॅग, एका कार्यक्रमासाठी साडे नऊ लाख, सोशल मीडियावर गाजणाऱ्या जया किशोरी आहेत तरी कोण?

Last Updated:

संपूर्ण जगाला भौतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा संदेश देणाऱ्या जया किशोरी स्वतः मात्र उलट वागत असल्याचा आरोप नेटिझन्स करत आहेत.

संपूर्ण जगाला भौतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा संदेश देणाऱ्या जया किशोरी स्वतः मात्र उलट वागत असल्याचा आरोप नेटिझन्स करत आहेत.
संपूर्ण जगाला भौतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा संदेश देणाऱ्या जया किशोरी स्वतः मात्र उलट वागत असल्याचा आरोप नेटिझन्स करत आहेत.
आध्यात्मिक कथाकार आणि भजन गायिका असलेल्या जया किशोरी सध्या सोशल मीडियावर वादात सापडल्या आहेत. त्या भाविकांना 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी'चा संदेश देतात. स्वतःच्या आयुष्यात त्या असं वागत नसल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. काही दिवसांपूर्वी जया किशोरी विमानतळावर एक ब्रँडेड बॅग घेऊन जाताना दिसल्या होत्या. पूर्ण पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असलेल्या जया किशोरी यांच्याकडे एक ट्रॉली बॅग आणि हँड बॅग होती. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं.
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, जया किशोरी यांच्याकडे असलेली हँडबॅग ही 'डिओर' (Dior) या प्रसिद्ध ब्रँडची असून तिची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ती 'डिओर बुक टोट' बॅग बनवण्यासाठी गायीच्या कातडीचा वापर केला जातो, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून नेटिझन्सनी जया यांना खूप ट्रोल केलं आहे. संपूर्ण जगाला भौतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा संदेश देणाऱ्या जया किशोरी स्वतः मात्र उलट वागत असल्याचा आरोप नेटिझन्स करत आहेत.
advertisement
अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करून या प्रकरणी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक्स युजर महिला म्हणाली, "वादानंतर जया किशोरी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढला आहे. त्या स्वतः लोकांना भौतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. स्वतःला भगवान कृष्णाच्या भक्त म्हणवतात. मात्र, त्यांच्याकडे असलेली बॅग गायीच्या चामड्यापासून बनवली जाते."

कोण आहेत जया किशोरी?

advertisement
इंडिया टाइम्सच्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै 1995 रोजी कोलकात्यात जया किशोरी यांचा जन्म झाला. त्यांनी आपलं शालेय शिक्षण कोलकात्यात पूर्ण केलं. ओपन स्कूलिंगमधून बी.कॉमची पदवी घेतली. 'आज तक'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, त्यांना सुरुवातीला डान्सर बनण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी 'बूगी वूगी' या रिॲलिटी शोमध्ये भाग देखील घेतला होता. मात्र, नंतर त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. आठवडाभर चालणारी 'श्रीमद भागवत गीता' कथा आणि 'कथा नानी बाई रो मायरो' नावाच्या तीन दिवसीय कथेसाठी वयाच्या सातव्या वर्षी त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर जया 'हिंदू कथाकार' म्हणून उदयास आल्या.
advertisement
त्या श्रीकृष्णाच्या भक्त असून कृष्णाच्या भजनांद्वारे त्यांनी लोकप्रियता मिळवली. 'शिवस्तोत्र', 'मेरे कान्हा' आणि 'साजन मेरा गिरधारी' ही त्यांची लोकप्रिय भजने आहेत. युट्युबवर त्यांचे सुमारे 3.61 दशलक्ष सब्सक्रायबर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, सामाजिक बदलासाठी जया किशोरी यांना मार्च 2024 मध्ये 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड' हा पुरस्कार दिला होता. त्या अध्यात्म, धर्म, लाईफ कोचिंग आणि नातेसंबंधांवर आधारित पॉडकास्टमध्ये सहभागी होतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर 12.3 दशलक्ष आणि फेसबुकवर 8.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
advertisement
असं म्हटलं जात की, जया किशोरी एका कार्यक्रमासाठी 9,00,000 रुपये आकारतात. एका मुलाखतीत त्या स्वतः देखील म्हणाल्या होत्या की, "मी फी घेते हे खरे आहे. कारण, मला माझ्या टीममधील कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो. माझ्या टीमशिवाय माझं कथावाचन शक्य नाही."
'अमर उजाला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, जया किशोरी एकूण 1.5 कोटी ते 2 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. त्या आपल्या कमाईतील निम्मी रक्कम वंचित आणि अपंग मुलांसाठी काम करणाऱ्या 'नारायण सेवा संस्थे'ला दान करतात. बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याशी जया किशोरी लग्न करणार असल्याचं वृत्त 'टाइम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलं होतं. शास्त्री यांनी या अफवांचं खंडन केलं होतं आणि जया किशोरी त्यांच्या बहिणीप्रमाणे असल्याचं सांगितलं होतं.
मराठी बातम्या/Viral/
2 लाखांची बॅग, एका कार्यक्रमासाठी साडे नऊ लाख, सोशल मीडियावर गाजणाऱ्या जया किशोरी आहेत तरी कोण?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement