आता सोहेलच्या बायकोनेही सांगितलं सलमान खानच्या कुटूंबाचं सत्य, ...असं का म्हणाली?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सोहेल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेहने 'फॅब्युलस लाइव्ह्स वर्सेस बॉलिवूड वाइव्हज' या शोमध्ये सलमान खानच्या कुटूंबाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह नुकतंच नेटफ्लिक्सच्या 'फॅब्युलस लाइव्ह्स वर्सेस बॉलिवूड वाइव्हज' या शोमध्ये दिसली होती. सीमाने या शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रंजक खुलासे केले आहेत. अलीकडेच, तिच्या पूर्वीच्या सासऱ्यांबद्दल बोलताना सीमा सजदेहने त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
सप्टेंबर महिन्यात सलमान खानचे वडील आणि सीमा सजदेहच्या माजी वहिनी मलायका अरोराच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर अरबाज खान तातडीने घटनास्थळी पोहोचला. सलमान खानही मलायका अरोरा आणि तिच्या आईच्या घरी भेटण्यासाठी पोहोचला. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले.
advertisement
पूर्व पतीच्या कुटुंबाची केले तोंडभरून कौतुक
याबद्दल बोलताना सीमा सजदेह म्हणाली की, तिलाही सलमान खानचा हा गुण आवडतो. ती म्हणते की, कोणत्याही कठीण काळात सलमान खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब सोबत उभे असते. सीमा सांगते, 'जेव्हा कुठलीही अडचण येते, तेव्हा तो सर्वात पुढे उभा राहतो. तुम्हाला काही गरज असेल तर खान कुटुंब तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहणार आणि म्हणूनच ते एक मजबूत कुटुंब आहे.'
advertisement
सलग तिसऱ्यांदा रिॲलिटी शोचा भाग झाली
या शोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यावर सीमा सजदेह म्हणाली की, रिॲलिटी शो सोपे नसतात. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडायची असते. हे अजिबात सोपे काम नाही. सीमा सजदेह या रिॲलिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. पहिल्या सीझनपासून ती याचा एक भाग आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2024 2:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आता सोहेलच्या बायकोनेही सांगितलं सलमान खानच्या कुटूंबाचं सत्य, ...असं का म्हणाली?