TRENDING:

'भारतात महिला सुरक्षित राहू शकत नाहीत...' जॉन अब्राहमचं मोठं वक्तव्य; पुरुषांवर केली टीका

Last Updated:

जॉनने चित्रपट आणि समाजाशी संबंधित अनेक समस्यांबद्दल मत व्यक्त केलं आहे. यावेळी जॉनने 'भारत महिला, मुले आणि प्राण्यांसाठी सुरक्षित नाही' असं वक्तव्य केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि वाणी कपूर स्टारर 'खेल खेल में' पेक्षा जॉन अब्राहमचा 'वेदा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे. जॉन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक मुलाखती देत आहे. नुकतंच तो पॉडकास्टमध्ये सामील झाला होता. यावेळी जॉनने चित्रपट आणि समाजाशी संबंधित अनेक समस्यांबद्दल मत व्यक्त केलं आहे. यावेळी जॉनने 'भारत महिला, मुले आणि प्राण्यांसाठी सुरक्षित नाही' असं वक्तव्य केलं आहे.
जॉन अब्राहम
जॉन अब्राहम
advertisement

जॉन अब्राहम कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाला की, 'भारतीय पुरुषांना समाजात महिलांशी कसं वागावं आणि त्यांचं संरक्षण कसं करावं हे समजून घेणं आवश्यक आहे. भारतात महिला, मुले आणि प्राणी सुरक्षित नाहीत. हे दुःखद आहे.'

TMKOC : 'जेठालाल'च्या नावानं बनवले अश्लील व्हिडिओ; निर्मात्यांची कोर्टात धाव; समोर आला मोठा निर्णय

advertisement

जॉन अब्राहम पुढे म्हणाला, “हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीसाठी, एक पुरुष संरक्षक असणं आवश्यक आहे. कारण मी भारतावर प्रेम करतो, मी भारत प्रेमी आहे, मी भारतावर टीका करणं फार महत्वाचं आहे. देशभक्ती आणि अंधराष्ट्रवाद यात फरक आहे. ‘माझा भारत महान आहे’ असं म्हटल्यानं तुम्ही भारतप्रेमी बनत नाही. जेव्हा तुम्ही समाजात बदल घडवून आणाल तेव्हाच तुम्ही भारत प्रेमी व्हाल.' असं मत जॉनने व्यक्त केलं आहे.

advertisement

जॉन अब्राहम पुढे म्हणाला, “माझ्या छोट्याशा जगात समाज बदलणं हेच माझं आयुष्यातील एकमेव ध्येय आहे. मी प्राण्यांना दर्जा देऊ इच्छितो. भारतातील प्राण्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. खेदाची बाब म्हणजे प्राण्यांच्या सुरक्षेसाठी एकही कायदा झालेला नाही. जेव्हा मी तुम्हाला सांगतो की भारतात महिला, मुले आणि प्राणी सुरक्षित नाहीत, तेव्हा तुम्ही वाद घालू शकत नाही." असं जॉन म्हणाला.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'भारतात महिला सुरक्षित राहू शकत नाहीत...' जॉन अब्राहमचं मोठं वक्तव्य; पुरुषांवर केली टीका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल