सलीम खान यांना 17 फेब्रुवारी 2026 पासून मुंबईतील रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी असल्याचं सांगितलं जात आहे. आमिर खान एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा मीडियाशी बोलताना तो म्हणाला, "मी सलीम साहेबांना भेटायला गेलो होतो. आम्ही सगळे त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. अलवीरा जींनी (सलीम खान यांची मुलगी) सांगितलं की त्यांची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत आहे.”
advertisement
आमिर पुढे म्हणाला, सलीम खान आयसीयूमध्ये असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही. मात्र कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते हळूहळू बरे होत आहेत. त्यांनी त्यांच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सलीम खान यांना किरकोळ ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हे हॅमरेज सौम्य स्वरूपाचं होतं आणि शस्त्रक्रियेची गरज भासली नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत खान कुटुंबामुळे प्रायव्हसी बाळगली आहे. रुग्णालयाकडून सुरुवातीला एक हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील कोणतीही माहिती सार्वजनिक करू नये, असे स्पष्ट निर्देश कुटुंबीयांनी दिले आहेत.
सलीम खान रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजताच अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली. यामध्ये शाहरुख खान, संजय दत्त, रणवीर सिंह, जावेद अख्तर, आमिर खान यांनीही रुग्णालयात पोहोचला.
