सलमान खान त्याच्या पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहे. पण ६० व्या वाढदिवसाच्या या खास पार्टीत त्याने चक्क भेळच्या काउंटरचा ताबा घेतला. त्याचे लाडके मित्र रितेश देशमुख आणि जिनिलिया डी'सूझा यांच्यासाठी सलमानने स्वतः चटपटीत भेळ तयार केली.
जिनिलियाने शेअर केला सलमान खानचा व्हिडीओ
जिनिलियाने हा व्हिडिओ शेअर करताना एक गोड कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलंय, "सलमान खानसारखं दुसरं कोणीच नाही! आपल्या माणसांना स्पेशल फील करून देण्यासाठी तो काहीही करू शकतो. यावेळी त्याने आम्हाला चविष्ट 'भाऊंची भेळ' खायला घातली. सलमान, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे!" रितेश आणि जिनिलियाने या भेळला प्रेमाने 'भाऊंची भेळ' असं नाव दिलं आहे.
advertisement
सलमान खानच्या ६० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
पनवेलचं फार्महाऊस सलमान्या साठाव्या वाढदिवसासाठी सजलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गजांची मांदियाळी तिथे पाहायला मिळाली. संजय दत्त, करिश्मा कपूर, मिका सिंग, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी, आदित्य रॉय कपूर यांसारख्या कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली. सलीम खान, सलमा खान, अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यासह संपूर्ण खान कुटुंब या आनंदाच्या क्षणी एकत्र होतं. अरबाजची मुलगी आणि पत्नी शुरा खान यांचीही उपस्थिती चर्चेत होती.
सलमानचा साधेपणा आणि स्वॅग
वयाची साठी गाठली तरी सलमानचा उत्साह आणि त्याचा साधेपणा तसाच आहे. जिनिलियाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून, "भाई जैसा कोई नहीं!" असं म्हणत अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
