"टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हा शो प्राइम व्हिडिओवर 25 सप्टेंबरपासून स्ट्रीम होणार आहे. दर गुरुवारी नवा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. टीझरमध्ये आमिर खान त्याच्या पहिल्या पत्नी रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसतो. आमिरने सांगितलं की, त्या कठीण काळात सलमान खान पहिल्यांदा त्याच्या घरी आला आणि तिथूनच दोघांची खरी मैत्री सुरू झाली. त्याआधी आमिरला सलमानबद्दल नकारात्मक मत होतं.
advertisement
काजोल की राणी मुखर्जी? दोन्ही बहिणींमध्ये कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत
आमिर पुढे म्हणाला, "मी त्याच्यावर खूप टीका केली होती, विशेषत: ‘अंदाज अपना अपना’ च्या शूटिंगदरम्यान, कारण तो वेळेवर यायचा नाही." सलमान खाननेही या शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे बोललं. लग्न आणि नातेसंबंधांबद्दल तो म्हणाला, "जेव्हा जोडीदार खूप जवळ येतात तेव्हा मतभेद वाढतात. पण माझा विश्वास आहे की एकत्र राहून एकमेकांना सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे. जर नातं टिकलं नाही तर त्याची जबाबदारी माझी आहे."
यावेळी सलमानने एक मोठं विधानही केलं. त्याने म्हटलं, "मला आता वडील व्हायचं आहे आणि मी लवकरच होणार आहे." त्याच्या या वक्तव्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या शोमध्ये पहिल्या भागानंतर विकी कौशल, कृती सेनन, आलिया भट्ट, करण जोहर, गोविंदा, चंकी पांडे यांसारखे अनेक सेलिब्रिटीही दिसणार आहेत. काजोल आणि ट्विंकलची जोडी प्रेक्षकांना नवी मजा आणि धमाल गप्पा देणार हे नक्की.