TRENDING:

मोठ्या पडद्यावरील ' छोटा श्याम' हरपला, अभिनेते माधव वझे यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा

Last Updated:

Madhav Vaze Passes Away : 'श्यामची आई' सिनेमातील श्यामची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'श्यामची आई' हा लोकप्रिय मराठी सिनेमा गाजवणारा छोटा श्याम आठवतोय? प्रसिद्ध अभिनेते माधव वझे यांनी श्याम ही भूमिका साकारली होती. ही भूमिका अजरामर करणारे अभिनेते माधव वझे यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं. श्यामची आई या सिनेमातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
News18
News18
advertisement

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी माधव वझे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक मराठी कलाकारांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

( 'घरातला आतंक आधी संपवायला हवा, मग बाहेरचा'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, रोख कोणाकडे? )

बालकालाकार म्हणून सुरूवात 

1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'श्यामची आई' या सिनेमात माधव वझे यांनी श्यामची भूमिका साकारली होती. बालकलाकार म्हणून त्यांच्या कामाचं सगळ्यांची कौतुक केलं होतं.  त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं.

advertisement

केवळ अभिनयात नाही माधव वझे हे उत्तम समीक्षक, लेखक, दिग्दर्शक, आणि प्राध्यापक देखील होते. पुण्यातील वाडिया महाविद्यालय येथे त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आणि प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले.

मराठी आणि हिंदी सिनेमात ठसा उमटवला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

प्राध्यापक म्हणून काम करताना माधव वझे यांनी सिनेमातही काम केलं. माधव वझे यांनी 'बापजन्म', 'एवढंस आभाळ' यांसारख्या मराठी सिनेमात काम केलं.  3 Idiots मध्ये त्यांनी जॉय लोबोच्या वडिलांची भूमिका केली होती. तर Dear Zindagi मध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत होते.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
मोठ्या पडद्यावरील ' छोटा श्याम' हरपला, अभिनेते माधव वझे यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल