'घरातला आतंक आधी संपवायला हवा, मग बाहेरचा'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, रोख कोणाकडे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Aditi Dravid on Operation Sindoor : भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानवर हल्ला केला. अभिनेत्री अदिती द्रविडने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई : भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून 7 मे 2025 रोजी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला जबर उत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने राबवलेलं हे एक मोठं लष्करी अभियान होतं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. 22 एप्रिल 2025 पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिलं. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता ज्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिक ठार झाले होते.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरातून प्रतिक्रिया देत आहे. मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अदिती द्रविड हिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अदिती द्रविड हिने पोस्टमध्ये लिहिलंय, "आणि आता मात्र ज्यांना पोटात दुखेल, त्यांनी थेट माझा देश सोडून जावं. घरातला आतंक आधी संपवायला हवा. मग बाहेरचा. जय हिंद", ऑपरेशन सिंदूरनंतर अदितीने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अदितीचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत चर्चा सुरू झाल्यात.
advertisement

अदिती द्रविड ही नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिची ही पोस्ट 'ऑपरेशन सिंदूर'ला पाठिंबा देणारी आहे. पाकिस्तानवर हल्ला कधी होणार? होणार की नाही, असे प्रश्न गेल्या 15 दिवसांत विचारून भारतीय सैन्यावर आणि सरकारवर ज्यांनी ज्यांनी अविश्वास दाखवला, त्यांच्या आता पोटात दुखत असेल तर त्यांनी देश सोडून जायला हवे, असे थेटपणे सांगत 'घरातला आतंक' आधी संपवायला हवा आणि नंतर बाहेरचा, अशी टिप्पणी आदितीने केली आहे. अदितीची पोस्ट व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरली आहे.
advertisement
अदिती द्रविड हिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, तिने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अदिती उत्तर डान्सर आहे. तसंच ती उत्तर लिखाण देखील करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 07, 2025 10:08 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'घरातला आतंक आधी संपवायला हवा, मग बाहेरचा'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, रोख कोणाकडे?









