व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सोनाली बेंद्रे म्हणाली, "लोक काहीही बोलतात. पण अशा गोष्टी केवळ कलाकारांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यात कुटुंबही ओढले जाते, जे दुःखद आहे." यावेळी तिने 29 वर्ष जुन्या क्षणाविषयीदेखील सांगितले. जेव्हा संगीताचा बादशाह, संपूर्ण जगाला आपल्या नृत्याने वेड लावणारा मायकल जॅक्सन भारतात प्रथमच आला होता. एनआयएला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने याविषयी भाष्य केले.
advertisement
राज ठाकरेंसोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर पहिल्यांदाच बोलली सोनाली, म्हणाली, 'आमचं नातं...'
29 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक क्षणाविषयी काय म्हणाली सोनाली?
साडी नेसलेली, ओठांवर गोड हास्य, हातात आरती आणि कपाळावर तिलक अशा पारंपरिक वेशात सोनालीने मुंबई विमानतळावर मायकल जॅक्सनचे स्वागत केले होते. हा क्षण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. पण आता जवळपास २९ वर्षांनंतर सोनालीने यावर प्रतिक्रिया दिली.
सोनाली म्हणाली, “माझ्या काकूच्या मैत्रिणी शर्मिला ठाकरे (राज ठाकरे यांच्या पत्नी) यांच्यामार्फत मला या कार्यक्रमासाठी विचारणा झाली. तेव्हा मी स्टार होती, त्यामुळे मी पटकन 'हो' म्हटले नाही. मी माझी अट घातली, मला माझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन शो बघायचा आहे आणि ते ही चांगल्या सीट्स पाहिजेत!”
सोनाली पुढे म्हणाली, “मी म्हटलं, शो बघायचाय, तिकिटे मिळणार असतील तर मी नक्की येते! आणि मग मी साडी नेसून आरती घेऊन विमानतळावर गेले. जॅक्सन आश्चर्यचकित झाला होता. भारतीय संस्कृतीचे तो मनापासून कौतुक करत होता.”
दरम्यान, सोनालीने स्पष्ट सांगितले की, "ठाकरे कुटुंबाशी आमचे जुने कौटुंबिक नाते आहे. माझ्या आईची मावशी म्हणजे शर्मिला ठाकरे यांची आई. त्यांनी मला १० दिवस त्यांच्या घरी ठेवले होते. त्या आमच्या घरच्यांसारख्याच होत्या. राज ठाकरे यांच्याशी आमचे कोणतेही वेगळे नाते नाही."
