Sonali Bendre On Raj Thackeray: राज ठाकरेंसोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर पहिल्यांदाच बोलली सोनाली, म्हणाली, 'आमचं नातं...'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sonali Bendre On Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र दिसले. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला. या व्हिडीओवर पहिल्यांदाच सोनालीने मौन सोडलं आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये अफेअरच्या चर्चा नवीन नाहीत. पण काही अफवा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याला थेट धक्का देतात. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्याविषयीही अशाच चर्चा झाल्या. गेल्या काही काळात तिचे जुने व्हिडिओ व्हायरल झाले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत तिच्या चर्चा झाल्या. अखेर सोनालीने यावर मौन सोडले आहे.
दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवर मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र दिसले. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर पुन्हा जुन्या चर्चाना उधाण आले. एएनआय ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने याविषयी स्पष्ट मत मांडले.
advertisement
राज ठाकरेंसोबत व्हिडिओवर काय म्हणाली सोनाली?
व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सोनाली बेंद्रे म्हणाली, "लोक काहीही बोलतात. पण अशा गोष्टी केवळ कलाकारांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यात कुटुंबही ओढले जाते, जे दुःखद आहे."
EP-305 | Sonali Bendre on Salman Khan, Raj Thackeray, Politics, Battle with Cancer & Her New Book#anipodcastwithsmitaprakash #sonalibendre #bollywood
Premiering now: https://t.co/p77CG7jNVr
— ANI (@ANI) June 7, 2025
advertisement
तिने स्पष्ट सांगितले की, "ठाकरे कुटुंबाशी आमचे जुने कौटुंबिक नाते आहे. माझ्या आईची मावशी म्हणजे शर्मिला ठाकरे यांची आई. त्यांनी मला 10 दिवस त्यांच्या घरी ठेवले होते. त्या आमच्या घरच्यांसारख्याच होत्या. राज ठाकरे यांच्याशी आमचे कोणतेही वेगळे नाते नाही."
advertisement
दरम्यान, राज ठाकरेंच्या व्हायरल व्हिडीओवर सोनाली बेंद्रे म्हणाली की, ती त्या कार्यक्रमात आपल्या बहिणीसोबत उभी होती आणि तिच्याशीच बोलत होती. सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवा खऱ्याच्या फार लांब असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 08, 2025 8:29 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sonali Bendre On Raj Thackeray: राज ठाकरेंसोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर पहिल्यांदाच बोलली सोनाली, म्हणाली, 'आमचं नातं...'









