Madhurani Gokhale: 'आईवडिलांचं पटत नाही, फक्त दाखवायचं नीट चाललंय', लग्नाविषयी काय बोलली मधुराणी? थेटच केला हल्लाबोल

Last Updated:
Madhurani Gokhale: टीव्हीवर सकस, शांत आणि संयमी दिसणारी आई अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून ती घराघरांत पोहोचली आणि तिची लोकप्रियता उंचावली.
1/7
टीव्हीवर सकस, शांत आणि संयमी दिसणारी आई अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून ती घराघरांत पोहोचली आणि तिची लोकप्रियता उंचावली.

advertisement
2/7
 मधुराणी तिच्या स्पष्टपणामुळे ओळखली जाते. काहीही असो ती एकदम ठळकपणे आणि बेधडकपणे बोलते. नुकतंच मधुराणीने लग्नाविषयी परखड पत व्यक्त केलंय जे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

3/7
‘आरपार’ या यूट्यूब मुलाखतीमध्ये मधुराणी गोखल मनसोक्त बोलली. ती म्हणाली, "आम्ही मोठं होताना सिनेमात पाहिलं ‘मेरा सपना कोई आएगा...’ आणि खरंच वाटायचं, स्वप्नातला राजकुमार कुठूनतरी येणार... पण कुणीच विचारलं नाही, त्या मुलीला स्वतः काय वाटतंय ते."

4/7
मधुराणीने स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या पिढीच्या वेळेला डेटिंग अॅप्स नव्हते, चॉईस नव्हता, आणि समाजाच्या चौकटीत फिट बसण्याचा ताण मात्र होता. "ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न केलंच पाहिजे," असा सामाजिक शिक्का होता, आणि तोच बाईच्या आयुष्याचं 'पूर्णविराम' असावा असं मानलं जायचं.

5/7
पण नंतर लक्षात यायचं, की हे वय, हे निर्णय आणि ह्या भावना सगळंच अपरिपक्व होतं. "त्या वयात ‘लग्न’ करायचं म्हणजे दोन अपरिपक्व माणसांना जबरदस्तीने पुढं ढकलणं!", असंही मधुराणी म्हणाली.

6/7
"आईवडिलांचं पटत नव्हतं पण चार लोकांपुढे दाखवत होते की किती नीट चाललंय सगळं." हे केवळ माझ्या घरात नव्हे, तर शेकडो घरांत चाललेलं असतं. ज्यात एका बाईनं ‘बाई’ म्हणून विचार न करता ‘फक्त बायको’ होण्याचं काम केलंय.

7/7
दरम्यान, आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर चाहते तिला मिस करत आहेत. तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement