23 जानेवारी 2026 रोजी सनी देओलचा बॉर्डर 2 हा सिनेमा रिलीज झाला आहे. अनुराग सिंह यांचं दिग्दर्शन तयार झालेल्या या सिनेमात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या रिलीजनंतर मुंबईत एक खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला सनी देओलला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या सावत्र बहिणी ईशा देओल आणि अहाना देओल यांनी हजेरी लावली होती.
advertisement
( Dharmendra : 'ही-मॅन'च्या अभिनय प्रवासाचा गौरव! धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर )
या स्क्रीनिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल आपल्या दोन्ही बहिणींसोबत पपाराझींसमोर उभा राहून पोज देताना दिसतो. काही क्षणांनंतर तो ईशा आणि अहानाला आत पाठवतो आणि स्वतः एकट्याने फोटो क्लिक करतो. वडिलांच्या निधनानंतर बहिणी ईशा आणि आहानावर वडिलांप्रमाणे प्रेम, माया करताना सनी देओल दिसला. या छोट्या पण भावनिक क्षणाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओल, ईशा देओल आणि अहाना देओल पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्या कुटुंबीयांनी मुंबईत प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. या सभेला बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. याशिवाय धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरी शोकसभा आयोजित केली होती. नंतर दिल्लीमध्येही हेमा मालिनी यांनी आपल्या दोन्ही मुलींसोबत शोकसभा घेत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली होती.
