TRENDING:

Suruchi Adarkar on Marriage : 2 लग्न मोडलेल्या पियुषशी लग्न का केलं? सुरूचीने पहिल्यांदाच मौन सोडलं

Last Updated:

Suruchi Adarkar on Marriage : सुरूची अडारकरने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्न केलं. पियुषचं हे तिसरं लग्न असून सुरूचीला ट्रोल करण्यात आलं. मुलाखतीत तिने त्यांच्या नात्याबद्दल आणि कुटुंबाच्या सपोर्टबद्दल सांगितलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'का रे दुरावा' मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरूची अडारकर. मालिकेनंतर सुरूची काही नाटकात काम करताना दिसली. हल्लीच काही मालिकांमध्येही तिनं काम केलं होतं. सुरूची अडारकरने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्न केलं आणि अचानक ती चर्चेचा विषय बनली. सुरूचीचं हे पहिलं लग्न असलं तरी पियुषचं हे तिसरं लग्न होतं, आणि हाच चर्चेचा विषय बनला. सुरूचीने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. पण तिने कायम मौन बाळगणं पसंत केलं.
अभिनेत्री सुरूची अडारकर
अभिनेत्री सुरूची अडारकर
advertisement

रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुरूचीने तिच्या आणि पियुषच्या लग्नाबद्दल पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. २ लग्न मोडलेल्या पियुषबरोबर लग्न करण्याचा निर्णय सुरूचीने कसा घेतला याबद्दल तिने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "माझ्या लग्नात माझ्या नवऱ्याकडचे आणि माझ्याकडे एकूण मिळून फक्त ४० लोक आले होते. आम्ही इंटिमेट वेडिंग केलं. आम्ही सगळ्यांना भेटलो. आम्ही आमचं लग्न एन्जॉय केली."

advertisement

( Suruchi-Piyush Wedding : दोनदा मोडला संसार; आता तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला मराठमोळा अभिनेता; कोण होत्या पहिल्या दोन पत्नी? )

सुरूची आणि पियुषची लव्ह स्टोरी

काम करताना आमचं काहीच नव्हतं. दीड वर्ष आम्ही केलं. आमच्या सगळ्यांची चांगली मैत्री होती. मालिका बंद झाल्यानंतर आमचा ग्रुप होता. मालिका संपल्यानंतर दोन वर्षांनी आम्ही पुन्हा कनेक्ट झालो. त्यानंतर आमची मैत्री आणखी छान झाली. आमच्या कोणीच कोणाला प्रपोज केलं नाही. सगळं म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर झालं. आम्हाला कळलं होतं की आपल्याला एकमेकांबद्दल फिलिंग्ज आहेत. त्यानंतरही आम्ही एकमेकांना जवळपास ३ वर्षांचा वेळ आम्ही आमच्यासाठी घेतला. त्यानंतर आपण लग्न करू शकतो असं आम्हाला कळतं. आम्ही आमच्या नात्याबद्दल पहिल्यांदा आमच्या कुटुंबाला सांगितलं. त्यानंतर मित्र मैत्रिणींना सांगितलं. आमची लव्ह स्टोरी खूप सिंपल आणि साधी आहे. पण आम्हा दोघांना गरज होती. माझ्यापेक्षा जास्त त्याला ( पियुश ) कोणीतरी समजून घेण्याची गरज होती. कारण तो त्याच्या आयुष्यातील खूप वाईट परिस्थितीतून जात होता.

advertisement

कुटुंबाची भक्कम साथ

सुरूची पुढे म्हणाली, "या निर्णयात माझे मित्र मैत्रिणी होतेच पण त्याहून भक्कम सपोर्ट हा मला माझ्या कुटुंबाचा होता. त्यांनी मला समजून घेतलं. ते माझ्या पाठिशी भक्कमपणे उभे होते. त्यामुळेच बाहेरचे लोक काय बोलत आहेत याचा आम्ही फार विचार केला नाही. आमच्या जवळची माणसं आमच्याबरोबर होती हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं."

advertisement

जोडीदाराची निवड कशी करावी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

"त्या माणासाबद्दल आपल्याला एक विश्वास असायला हवा की ती व्यक्ती आपल्याला कधीच सोडून जाणार नाही. आताच्या जगात असं नाही राहिलं. रील एक मिनिटाचं झालं आहे. माणसांकडेही तेवढाच पेशन्स राहिलाय. नात्यावर मेहनत घ्यायला कोणीच तयार नसतं, सोडून द्यायला सगळेच तयार असतात लगेच. लोकांच्या आयुष्यात पर्याय खूप आहेत. आज तू नाहीस तर दुसरं कोणीतरी आहे. हे सांगू बोलून होत नसतं, हे आपसूक होत असतं. मी कधीच गोष्टी सोडून देत नाही. मला त्या सॉल्व करायला आवडतात. माझ्यात खूप पेशन्स आहे. पियुशचं देखील असंच आहे. तो गोष्टी सोडून देत नाही. त्यासाठी आम्ही, भांडतो, चिडतो, रडतो पण दिवसाच्या शेवटी आम्ही सेम पेजवर असतो."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Suruchi Adarkar on Marriage : 2 लग्न मोडलेल्या पियुषशी लग्न का केलं? सुरूचीने पहिल्यांदाच मौन सोडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल