advertisement

Suruchi-Piyush Wedding : दोनदा मोडला संसार; आता तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला मराठमोळा अभिनेता; कोण होत्या पहिल्या दोन पत्नी?

Last Updated:

सुरुची आडारकरचं हे पाहिलंच लग्न असलं तरी पियुष रानडे याने मात्र आता तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. पियुषची पाहिलं दोन लग्न असफल ठरली. कोण होत्या त्याच्या पहिल्या दोन बायका जाणून घ्या.

सुरुची आडारकर आणि पियुष रानडे
सुरुची आडारकर आणि पियुष रानडे
मुंबई, 06 डिसेंबर : सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक जोडपी लग्नबंधनात अडकत आहेत. अमृता आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नानंतर चित्रपटसृष्टीतील अजून एक जोडी लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्री सुरुची आडारकर आणि पियुष रानडे यांनी नुकतच लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुरुची आडारकरचं हे पाहिलंच लग्न असलं तरी पियुष रानडे याने मात्र आता तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. पियुषची पाहिलं दोन लग्न असफल ठरली. कोण होत्या त्याच्या पहिल्या दोन बायका जाणून घ्या.
पियुष रानडे हा मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या एकाच या जन्मी जणू, अस्मिता, पिंकीचा विजय असो या मालिका चांगल्याच गाजल्या. मात्र यासोबतच त्यांचं लव्हलाईफही चांगलंच चर्चेत राहिलं. अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं आहे. त्याचे लग्न आणि घटस्फोट सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरले. आता आयुष्यात पहिली दोन लग्न मोडल्यानंतर पियुषने सुरुची आडारकर या अभिनेत्रींसोबत पुन्हा एकदा संसार थाटला आहे.
advertisement
नादच केला राव! रणबीर कपूरचा Animal गाजवतायत 'हे' मराठी कलाकार; अजय अतुलचं हे गाणंही होतंय हिट
2010 मध्ये, पियुष रानडेने अभिनेत्री शाल्मली टोल्येसोबत पहिल्यांदा लग्नगाठ बांधली. शाल्मली टोल्ये एक अभिनेत्रीसोबतच मराठी कलाकारांसाठी स्टायलिस्ट म्हणूनही काम करते. दोघांच्याही सुखी संसाराला सुरुवात झाली मात्र त्यांचा हा आनंद अल्पकाळ टिकला. दोघांनीही लग्नाच्या चार वर्षानंतर म्हणजेच 2014 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाचं कारण मात्र कधी समोर आलं नाही.
advertisement
पाहिलं लग्न मोडल्यानंतर पियुषने पुन्हा दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर तीन वर्षांनी म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये त्याने अभिनेत्री मयुरी वाघसोबत दुसरं लग्न केलं. या दोघांची भेट "अस्मिता" या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. दोघांचीही ही मालिका गाजली होती, सोबतच त्यांचं एकमेकांवर प्रेम जुळलं. दोघांनीही मोठ्या थाटात दुसरं लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून ते दोघे खूप सुखी राहतील असं वाटत होतं.
advertisement
दुर्दैवाने, पियूषच्या दुसऱ्या लग्नातही त्याला अडचणींचा सामना करावा लागला. लग्नानंतर काही महिन्यातच पियुष आणि मयुरी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाची कारणे मोठ्या प्रमाणात अज्ञात राहिली.
आता पियुष रानडेच्या आयुष्यात नवं प्रेम आलं असून त्याने टीव्ही अभिनेत्री सुरुची अडारकर सोबत पुन्हा एकदा संसार थाटला आहे.आता या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suruchi-Piyush Wedding : दोनदा मोडला संसार; आता तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला मराठमोळा अभिनेता; कोण होत्या पहिल्या दोन पत्नी?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement