दिशा वकानीचा साधेपणा
दिशा वकानी गेल्या काही दिवसांपासून TV इंडस्ट्रीतून गायब आहे. गेल्या सहा वर्षांत ती एकदाही मालिकेत दिसलेली नाही. फारच क्वचित ती स्पॉट झाली आहे. पण नुकतीच दिशा एका ठिकाणी स्पॉट झाली असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये दिशा वकानी एका छोट्या मुलीसोबत फोटो काढताना दिसत आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा फ्लोरल सूट घातला आहे. थकलेला चेहरा, डोळ्यांवर चष्मा, केसांमध्ये तेल अशा अतिशय साध्या लूकमध्ये दिशा दिसत आहे. तसेच तिचं वजनदेखील कमी झालेलं पाहायला मिळत आहे.
advertisement
दिशाच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतीक्रिया
दिशा वकानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दयाबेन रिअल लाईफमध्ये किती साधी आणि गोड आहे, खूप दिवसांनी दिसली, दयाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, पुन्हा मालिकेत कधी येणार, प्लीज, परत या, अशा कमेंट्स करत चाहते त्यांच्या लाडक्या दयाबेनला पुन्हा मालिकेत येण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत.
दया बेन अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेपासून दूर आहे. मुलीच्या जन्मानंतर तिने या मालिकेपासून दूर राहणं पसंत केलंय. कोरोनाकाळात दयाबेनच्या कमबॅकची चर्चा होती. पण नंतर ती प्रेग्नंट राहिली आणि मालिकेपासून दूर राहिली. पुढे काही दिवसांनी मालिकेत परत येणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं. तरीसुद्धा चाहते आजही तिच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. दयाबेन सोशल मीडियापासून दूर असून अतिशय साधं आयुष्य जगत आहे. आपला संपूर्ण वेळ ती मुलांसोबत घालवते.
