दरम्यान, या मालिकेत सावनी हे खलनायिकेचे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरसोबत तेजश्रीचं खूपच खास नातं आहे. त्या या मालिकेत एकमेकांच्या आमनेसामने असल्या तरी त्यांच्यात मैत्रीचं घट्ट नातं होतं. मात्र आता या दोघींशी निगडित एक बातमी समोर आली आहे. तेजश्री आणि अपूर्वा यांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
Unstoppable प्राजक्ता माळी! पाहा वेल्वेट थ्री-पिस ड्रेसमधील ग्लॅमरस PHOTO
advertisement
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री मुक्ता ही भूमिका साकारत होती तर खलनायिका अपूर्वा नेमळेकर सावनी ही भूमिका साकारत आहे. मालिकेत एकमेकींच्या वैरीणी असणाऱ्या तेजश्री आणि मुक्ता ऑफ कॅमेरा जीवाभावाच्या मैत्रीणी होत्या. त्या एकत्र दुबई ट्रिपलाही गेल्या होत्या. सगळं सुरळीत असतानाच तेजश्रीने ही मालिका का सोडली हा प्रश्न चाहत्यांना पडला असतानाच या दोघींनी एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.
विशेष म्हणजे, तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर अपूर्वाने आपल्या मैत्रिणीसाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. याउलट या मालिकेत नव्या मुक्ताची एन्ट्री झाल्यानंतर अभिनेत्रीचे स्वागत करण्यासाठी अपूर्वाने लांबलचक पोस्ट लिहिली होती. यात तेजश्रीचा उल्लेखही नव्हता. अशा परिस्थितीत तेजश्रीने मालिका सोडण्याचं कारण अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तर नाही ना, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
दरम्यान, तेजश्रीने मालिका सोडताना एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहिलं होतं, “कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमची किंमत आणि तुमच्या असण्याचे महत्त्व ओळखा, कारण दुसरं कोणीही हे तुमच्यासाठी करणार नाही.” अद्याप तेजश्रीने ही मालिका का सोडली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याचप्रमाणे, तेजश्रीकडूनही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
