तेजस्विनी पंडीत "अहो! विक्रमार्का" या तेलुगू सिनेमातून पदार्पण करत आहे. या सिनेमात ती भवानी शंकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तेजस्विनीच्या नव्या तेलुगू सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. ज्यात तेजस्विनीचा दमदार लुक समोर आला आहे. पोस्टरमध्ये तेजस्विनी पंडीतच्या कपाळावर खोप पडली आहे. चेहरा थकलेला असला तरी चेहऱ्याच तेज दिसत आहे. तिनं अंगावर राखाडी रंगाची शाल पांघरली आहे.
advertisement
तेजस्विनी पंडीतनं सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. "जेव्हा विश्वासाला तडा जातो, तेव्हा त्याची जागा धैर्य भरून काढते. तेलुगू चित्रपटातील माझं पदार्पण. शुभेच्छा आणि आशिर्वाद असुद्या", असं कॅप्शन देत तेजस्विनीनं सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. तेजस्विनीचा हा सिनेमा तेलुगू असला तरी तो मराठी भाषेसह इतर 5 भाषांमध्येही रिलीज होणार आहे.
तेजस्विनी पंडीत ही मागील काही महिन्यांपासून तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. राजकीय आणि सामाजिक विषयांवर तेजस्विनी पंडीत प्रामुख्यानं भाष्य करताना दिसली आहे. तेजस्विनीला तिच्या नव्या तेलुगू सिनेमासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनी पंडीत महत्त्वाच्या भुमिकेत असलेला "अहो! विक्रमार्का" हा सिनेमा 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
"अहो! विक्रमार्का" सिनेमातील भुमिकेविषयी बोलताना तेजस्विनी म्हणाली, "आपली मातृभाषा नसलेल्या सिनेमांमधअये काम करण हे खरं आव्हान असतं. या सिनेमात भाषेचं मोठं आव्हान होतं. त्या भाषेतील व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं. मला प्रत्येक शब्दामागील अर्थ आणि लहेजा समजून-उमजून भूमिका करावी लागत होती. साऊथचे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ वेळेबाबतीत प्रचंड शिस्तप्रिय आहेत. त्यांच्यात असलेला साधेपणा मला खूप भावला. आजवर माझ्या वेगवेगळ्या भुमिकांसाठी प्रेक्षकांनी मला पाठिंबा दिला आहे. आता ‘अहो विक्रमार्का’ सिनेमातील माझी भुमिका देखील तुम्हाला आवडेल आणि त्याचं तुम्ही कौतुक कराल अशी मला खात्री आहे".
