advertisement

कॅन्सरशी झुंज देताना विजय कदम यांना मुख्यमंत्री शिंदे-फडणवीसांनी अशी केली मदत, पत्नीनं सांगितला खडतर प्रवास

Last Updated:

अभिनेते विजय कदम यांची कॅन्सरच्या उपचारांदरम्यान इन्शुरन्स एजन्सीकडून फसवणूक करण्यात आली. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय कदम यांची मदत केली.

विजय कदम यांना मुख्यमंत्री शिंदे-फडणवीसांनी केली होती मदत
विजय कदम यांना मुख्यमंत्री शिंदे-फडणवीसांनी केली होती मदत
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचं 10 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. मागील एक ते दीड वर्ष ते कॅन्सरचा सामना करत होते मात्र उपचारांती त्यांचं निधन झालं. कॅन्सरच्या उपचारांदरम्यान त्यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. इन्शुरन्स एजन्सीकडून त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय कदम यांची मदत केली.
दिवंगत अभिनेते विजय कदम यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली पण संपूर्ण उपचारांदरम्यान ते कमालीचे पॉझिटिव्ह होते. त्यांची पत्नी पद्मश्री जोशी यांनी एका मुलाखतीत कॅन्सरच्या उपचारांदरम्यान आलेल्या खडतर प्रवासाविषयी सांगितलं.
फेब्रुवारी 2023मध्ये विजय कदम यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्यांनी तात्काळ ट्रिटमेंट सुरू केली. त्यांच्यावर 4 किमो थेरपी आणि 2 सर्जरी करण्यात आल्या. ट्रिटमेंट सुरू करण्याआधी त्यांच्या पत्नीन इन्शुरन्स कंपनीला फोन करून सगळी माहिती दिली. इन्शुरन्स कंपनीच्या सांगण्यावरून त्यांच्या कॅशलेस हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंटसाठी फॉर्म भरला. विजय कदम यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू झाले. दुसऱ्याच दिवशी इन्शुरन्स कंपनीकडून फोन आला ते इन्शुरन्स अप्रुव करू शकणार नाही. विजय कदम यांना डायबिटीज असल्यातं सांगण्यात आलं नाही असा आरोप त्यांनी केला.
advertisement
विजय कदम यांच्या पत्नी म्हणाल्या, “एका वेळेस मुख्यमंत्र्यांच्या मदतीची आम्हाला गरज होती तेव्हा आम्ही सुशांत शेलार आणि मंगेश यांना फोन केला. त्यांनी मला मदत केली. मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं त्यांनी मदत केली."
त्या पुढे म्हणाल्या, "संकट येतात तेव्हा ती दोन्ही बाजूने येतात. इन्शूरन्स कंपनीने हात वर केले. मी त्यांना दाखवलं तुमच्या पहिल्या पेजवर लिहिलंय की 14 वर्षांपासून विजयला डायबिटीज आहे. मी त्या कंपनीविरोधात विमा लोकपालमध्ये केस केली. तारखेला जाऊन उभी राहत होते केस लढले, निकाल माझ्या बाजूने लागला तरीही ते पैसे भरायला नव्हते. शेवटी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्याकडे गेले. त्यांच्या प्रशासकीय कार्यालयाने आम्हाला मदत केली".
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
कॅन्सरशी झुंज देताना विजय कदम यांना मुख्यमंत्री शिंदे-फडणवीसांनी अशी केली मदत, पत्नीनं सांगितला खडतर प्रवास
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement