आजवर प्रियदर्शिनीने अनेक विनोदी आणि गंभीर भूमिका गाजवल्या आहेत. पण 'लग्नाचा शॉट'मध्ये ती चक्क एका रोमँटिक हिरोईनच्या अवतारात दिसणार आहे. आपल्या अनुभवाबद्दल सांगताना ती कमालीची उत्साही दिसली.
पहिल्यांदाच रोमँटिक अंदाजात दिसणार प्रियदर्शिनी
प्रियदर्शिनी म्हणते, "खरं सांगू तर, अशा प्रकारचा रोमँटिक सिनेमा मी पहिल्यांदाच करतेय. पडद्यावर रोमान्स करणं माझ्यासाठी नवीन होतं, पण अभिजीतसोबत हे सगळं खूप सहज झालं. तो कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध आहे. सुरुवातीला आमची ओळख नव्हती, पण शूटिंग दरम्यान आम्ही चांगले मित्र झालो. मी जेव्हा जेव्हा 'एकदा पुन्हा सीन करूया' असं म्हणायचे, तेव्हा त्याने कधीच कंटाळा न करता मला साथ दिली. आमचं एक रोमँटिक गाणंही लवकरच येतंय, जे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल."
advertisement
चालताही येईना, स्वतःला सावरताही येईना, एअरपोर्टवर फॅन्सच्या गर्दीत विजयसोबत काय घडलं? VIDEO VIRAL
दुसरीकडे, अभिजीत आमकरसाठी हा प्रवास खूप खास आहे. नाटकातून अभिनयाचे धडे गिरवून आता मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत येताना त्याला खूप समाधान वाटतंय. अभिजीत सांगतो, "मेहनत तर प्रत्येक कामात असतेच, पण प्रियदर्शिनीसोबतची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल. आम्ही दोन अशा व्यक्तींची कथा मांडतोय ज्यांची ओळख नसते, पण मग प्रेमाचा शॉट कसा लागतो, हे पाहणं मजेशीर असेल. प्रियदर्शिनीची स्वतःची एक वेगळी स्टाईल आहे आणि ती तिच्या कामात खूपच एकाग्र असते. पूर्ण टीममध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी होती, जी तुम्हाला सिनेमातही दिसेल."
कधी रिलीज होणार प्रियदर्शिनी-अभिजीतचा 'लग्नाचा शॉट'?
महापर्व फिल्म्स आणि जिजा फिल्म कंपनी प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गाणी आणि संगीताची जबाबदारी प्रवीण कोळी आणि योगिता कोळी या जोडीने सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
