चालताही येईना, स्वतःला सावरताही येईना, एअरपोर्टवर फॅन्सच्या गर्दीत विजयसोबत काय घडलं? VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Thalapathy Vijay Last Movie : थलापती विजयच्या शेवटच्या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमाच्या वेळी जे घडलं, त्याचा कोणीही विचार केला नसेल.
चेन्नई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार्सची क्रेझ पाहण्यासारखी असते. येथील चाहते आपल्या आवडत्या स्टार्ससाठी काहीही करायला तयार असतात. त्यांची एक झलक पाहायला ते लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. याचा प्रत्यय आजवर अनेकदा आला आहे. साऊथचा असाच एक सुपरस्टार म्हणजे थलापती विजय. विजयने आता सिनेसृष्टी सोडून कायमचं राजकारणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याआधी त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमाच्या वेळी जे घडलं, त्याचा कोणीही विचार केला नसेल.
थलापती विजय जिथे जातो, तिथे त्याला पाहण्यासाठी जणू जनसागराचा महासागर लोटतो. पण रविवारी रात्री चेन्नई विमानतळावर जे घडलं, ते पाहून विजयच्या लाखो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मलेशियात आपल्या शेवटच्या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचचा ऐतिहासिक सोहळा आटोपून परतणाऱ्या विजयचा विमानतळावर चाहत्यांच्या अलोट गर्दीमुळे पाय घसरला आणि तो खाली पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.
advertisement
विमानतळावर नक्की काय घडलं?
मलेशियातील जबरदस्त म्युझिक विजय रविवारी रात्री चेन्नईत परतला. विमानतळाबाहेर आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो तरुण तासनतास थांबले होते. विजय बाहेर येताच चाहत्यांनी आणि 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) या त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयला भेटण्यासाठी त्याच्या गाडीकडे एकच गर्दी केली.
advertisement
सुरक्षा रक्षकांच्या कड्यातून विजय आपल्या कारकडे जात असताना अचानक लोकांचा लोंढा पुढे आला आणि चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली. याच गोंधळात विजयचा पाय घसरला आणि तो खाली कोसळला. सेकंदभरात सुरक्षा रक्षकांनी त्याला सावरलं आणि सुरक्षितपणे गाडीत बसवलं.
VIDEO | TVK chief Vijay stumbled and fell while trying to get into his car at the Chennai airport.
A large crowd of fans gathered to welcome him as he returned from Malaysia.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/x42Kpd0AsW
— Press Trust of India (@PTI_News) December 28, 2025
advertisement
मलेशियात रचला नवा इतिहास
दरम्यान, विजयच्या मलेशियातील भाषणाची जास्त चर्चा होत आहे. त्याचा शेवटचा चित्रपट 'जन नायकन' च्या ऑडिओ लाँचसाठी क्वालालंपूरमधील स्टेडियममध्ये तब्बल १ लाख लोक जमले होते. मलेशियाच्या बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या सोहळ्याची नोंद 'सर्वात मोठा ऑडिओ लाँच सोहळा' म्हणून करण्यात आली आहे. तथापि, या सोहळ्यात विजय भावूक झाला होता.
advertisement
advertisement
या कार्यक्रमात विजयने आपल्या अभिनयाचा प्रवास थांबवून पूर्णवेळ राजकारणात उतरण्याची घोषणा केली. चाहत्यांशी संवाद साधताना तो म्हणाला, "जेव्हा मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं, तेव्हा वाटलं होतं की मी वाळूचा एक छोटासा किल्ला बनवेन. पण तुम्ही माझ्यासाठी महाल बांधलात. तुम्ही माझ्याभोवती एक अभेद्य किल्ला उभा केलात. ज्या चाहत्यांनी मला सगळं काही दिलं, त्यांच्यासाठी आता मी सिनेमागृहाचा पडदा सोडून प्रत्यक्ष मैदानात उतरत आहे."
advertisement
तमिळ भाषेत 'कोट्टई' (किल्ला) या शब्दाचा अर्थ राज्याची सत्ता असाही होतो, त्यामुळे विजयने थेट सत्तेच्या सिंहासनाकडे आपलं लक्ष वळवल्याचे संकेत दिले आहेत.
कधी रिलीज होणार थलापती विजयचा शेवटचा सिनेमा?
एच. विनोथ दिग्दर्शित 'जन नायकन' हा चित्रपट पोंगल २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. हा विजयचा शेवटचा चित्रपट असेल. त्यानंतर तो मदुराई पूर्व मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. एका बाजूला डीएमके (DMK) सारखे मोठे पक्ष आणि दुसरीकडे विजयचा 'टीव्हीके' (TVK) पक्ष, असा हा सामना आता रंजक होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 1:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
चालताही येईना, स्वतःला सावरताही येईना, एअरपोर्टवर फॅन्सच्या गर्दीत विजयसोबत काय घडलं? VIDEO VIRAL










