मुंबई पोलिसांनी अकट केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद इलियास शरीफुल इस्लाम शहजाद सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपीची चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक खुलासे होत आहेत.
काही तासांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इलियास शरीफुल इस्लाम शहजाद याने सैफच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अनेक बड्या सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. आरोपी एका रिक्षाचालकाकडून सेलिब्रिटींच्या घरांची माहिती घेत असे. दरम्यान, पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी या रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी वांद्रे परिसरात राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती रिक्षाचालकाकडून मिळवली होती. शहजाद रिक्षावाल्याकडून कलाकारांच्या घरांची माहिती घेत असे आणि ते कोणते घर कोणाचे आहे, याबाबत इतर माहिती जाणून घेत असे.
advertisement
दरम्यान, आता या प्रकरणी पोलिस आरोपीचे कपडे तपासणीसाठी पाठवणार आहेत. आरोपीने घटनेच्या वेळी घातलेले कपडे, त्यानंतर तो रस्त्यावर फिरत असताना घातलेले कपडे, त्याचा मोबाईल फोन, दुकानातून घेतलेले इअरफोन इत्यादी सामान पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांनी हे सामान फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवले आहे.
आरोपी बांगलादेशचा रहिवासी
मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीकडून पोलिसांना कोणतेही कागदपत्र मिळालेले नाही. पोलिसांनी आरोपीच्या पालकांचे नंबर मिळवले. पोलिस त्यांच्याशी बोलले असता त्यांनी तो त्यांचा मुलगा असल्याचे सांगितले. आरोपीचे बारावीपर्यंत शिक्षण बांगलादेशात झाले असून तो शालेय स्तरावर खेळात भाग घेत असे.
