26 वर्षांनंतरही तीच जादू, तोच उत्साह, पुन्हा एकदा 'सत्या'ची भुरळ, लोकांचं प्रेम पाहून मनोज वाजपेयी भावूक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
'सत्या' या सिनेमातील लोकप्रिय गाणे 'सपने में मिलती हैं' वर लोक आनंदाने नाचताना दिसत आहेत.
सध्या बॉक्स ऑफिसवर जुने हिट सिनेमे रीरिलीज करण्याचा ट्रेंड सुरू आहे. आतापर्यंत 'लैला मजनू', 'ये जवानी है दिवानी' असे अनेक सिनेमांनी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. या चित्रपटांमधील एक चित्रपट म्हणजे मनोज वाजपेयी यांचा कल्ट क्लासिक सिनेमा 'सत्या' सिनेमागृहांमध्ये दाखल झाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात लोक या चित्रपटाच्या आनंदात सिनेमागृहात नाचताना दिसत आहेत. दरम्यान, लोकांचा हा आनंद पाहून मनोजही खूश झाले आहेत. हा व्हिडिओ पुण्यातील एका सिनेमागृहातील आहे. या सिनेमातील लोकप्रिय गाणे 'सपने में मिलती हैं' वर लोक आनंदाने नाचताना दिसत आहेत.
advertisement
मनोज यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "२६ वर्षांनंतरही 'सत्या' चित्रपटगृहांवर राज्य करत आहे आणि लोकांची मने जिंकत आहे. मोठ्या पडद्यावर हा कल्ट क्लासिक पाहण्यात एक वेगळीच जादू आहे. भावना, संगीत आणि अविस्मरणीय कथा. कधीही जुना होत नाही असा हा अनुभव आहे. धन्यवाद, @rgvzoomin, ही कालातीत कलाकृती तयार केल्याबद्दल. आणि या महान टीमला सलाम."
advertisement
advertisement
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या क्राइम मूव्हीने हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' किंवा 'मिर्झापूर' सारख्या अनेक आधुनिक नॉयर ड्रामा चित्रपटांचा तो अग्रदूत बनला. या चित्रपटाने अनेक कलाकारांना पुढे आणले, जे या इंडस्ट्रीतील सध्याच्या घडीतील मोठी नावे आहेत. अनुराग कश्यप ज्यांनी सौरभ शुक्ला, मनोज बाजपेयी, संगीतकार संदीप चौटा आणि इतरांसोबत या सिनेमाची पटकथा लिहिली होती. हा चित्रपट शाहरुख खान स्टारर 'कुछ कुछ होता है' च्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जो ब्लॉकबस्टर ठरला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
26 वर्षांनंतरही तीच जादू, तोच उत्साह, पुन्हा एकदा 'सत्या'ची भुरळ, लोकांचं प्रेम पाहून मनोज वाजपेयी भावूक









