advertisement

Coldplay Concert मध्ये मराठीचा जलवा! परदेसी बाबूने जिंकलं मुंबईकरांचं मन, पाहा Video

Last Updated:

Coldplay Mumbai Concert : सध्या सोशल मीडियावर कोल्डप्ले कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ख्रिस मार्टिन आलेल्या प्रेक्षकांशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहे.
ख्रिस मार्टिन आलेल्या प्रेक्षकांशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहे.
Coldplay Mumbai Concert : सध्या देशात एकच वेड दिसून येत आहे, ते म्हणजे कोल्डप्ले कॉन्सर्टचं. नुकतंच मुंबईत कोल्डप्ले कॉन्सर्ट पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने लोक दाखल झाले होते. कॉन्सर्टला प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनेही हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या पती आणि बाबांसह या कॉन्सर्टचा आनंद लुटला. तिचा कोल्डप्लेचा हा दुसरा कॉन्सर्ट होता.
दरम्यान, मुंबईतील कोल्डप्लेचा हा कॉन्सर्ट अनेक कारणांमुळे खास ठरला आहे. यावेळी चाहत्यांची तुफान गर्दी तर पाहायला मिळालीच, मात्र प्रेक्षकांना कोल्डप्लेच्या गाण्यांसह काही खास क्षणही अनुभवायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर कोल्डप्ले कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ख्रिस मार्टिन आलेल्या प्रेक्षकांशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहे. ख्रिस मार्टिनने कॉन्सर्टला आलेल्या चाहत्यांना मराठी आणि हिंदी भाषेतून अभिवादन केले. तो मराठीतून म्हणाला, "जय श्री राम, तुम्ही सगळे खूप छान दिसत आहात." तो हिंदीतून बोलला की "तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मुंबईत येऊन मला खूप आनंद झाला."
advertisement
advertisement
दरम्यान, राजश्री मराठीने शेअर केलेला हा व्हिडिओ खूप पाहिला गेला आहे. चाहत्यांनी ख्रिस मार्टिनच्या कृतीचे खूप कौतुक केले आहे. त्याने केलेल्या या लहानशा गोष्टीने मुंबईकरांचं मन जिंकलं आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत.

कोल्डप्लेचे ग्रँड इंडियन टूर शेड्यूल

2016 च्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलनंतर हा बँड पुन्हा एकदा भारतात परतला आहे. हे कॉन्सर्ट्स पूर्वीपेक्षा अधिक भव्य असल्याचे वचन बँडने दिले आहे. या दौऱ्यात मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम येथे तीन कार्यक्रमांचा समावेश आहे. 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी पाटील स्टेडियम, त्यानंतर 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये परफॉर्मन्स होईल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Coldplay Concert मध्ये मराठीचा जलवा! परदेसी बाबूने जिंकलं मुंबईकरांचं मन, पाहा Video
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement