एका रिक्षावाल्याने उडवली बॉलिवूडकरांची झोप, सैफवरील हल्ल्यानंतर अख्खी इंडस्ट्री दहशतीत, पोलिसांची पळापळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Saif Ali Khan Attacker: या आरोपीने केवळ सैफ अली खान, शाहरुख खान यांच्याच घराची नाही, तर इतर अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली आहे. यामध्ये त्याला एका रिक्षाचालकाने मदत केली होती.
Saif Ali Khan Attacker: गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान हे प्रकरण चांगलेच तापले आहे. सैफवरील हल्ल्याच्या तीन दिवसांनी पोलिसांना या गुन्ह्यातील एका आरोपीला पकडण्यात यश आले असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अशीच एक माहिती म्हणजे, या आरोपीने केवळ सैफ अली खान, शाहरुख खान यांच्याच घराची नाही, तर इतर अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली आहे. यामध्ये त्याला एका रिक्षाचालकाने मदत केली होती.
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद इलियास शरीफुल इस्लाम शहजाद याने सैफच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अनेक बड्या सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. आरोपी एका रिक्षाचालकाकडून सेलिब्रिटींच्या घरांची माहिती घेत असे. दरम्यान, पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी या रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी वांद्रे परिसरात राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती रिक्षाचालकाकडून मिळवली होती. शहजाद रिक्षावाल्याकडून कलाकारांच्या घरांची माहिती घेत असे आणि ते कोणते घर कोणाचे आहे, याबाबत इतर माहिती जाणून घेत असे.
advertisement
पोलीस त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत, जेणेकरून आरोपीने आणखी कोणत्या स्टारच्या घराची रेकी केली होती ते कळू शकेल. शाहरुख खान-सैफ अली व्यतिरिक्त आरोपींनी इतर अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. सैफ अलीवर हल्ल्याचा आरोप असलेला बांगलादेशी नागरिक शेहजाद पोलिसांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
advertisement
पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमधून संशयितांचे फोटो सापडले असून, ते जप्त करण्यात आले आहेत. ही छायाचित्रे व बातम्यांद्वारे आरोपी पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस ज्यांना चौकशीसाठी आणायचे, त्या संशयितांची छायाचित्रे त्या मोबाईलमध्ये सापडली आहेत. वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत असलेल्या संशयितांचे स्क्रिनशॉटही आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत. पोलिसांनी फोन जप्त केला आहे.
advertisement
मुंबई पोलिसांनी यापूर्वीही सैफ अलीवरील हल्ल्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. या दोघांचे दिसणे आणि शरीरयष्टी मुख्य आरोपींसारखीच होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी पोलिसांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, ही घटना घडलेल्या सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात ते गुन्ह्याची पार्श्वभूमी पुन्हा तयार करतील.
advertisement
बांगलादेशी नागरिक असलेल्या आरोपी शहजादला पोलिसांनी रविवारी सकाळी ठाणे शहरातून अटक केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिस शहजादला क्राइम सीन पुन्हा तयार करण्यासाठी सैफच्या घरी घेऊन जातील. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि म्हटले, “होय, मी ते केले.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2025 3:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
एका रिक्षावाल्याने उडवली बॉलिवूडकरांची झोप, सैफवरील हल्ल्यानंतर अख्खी इंडस्ट्री दहशतीत, पोलिसांची पळापळ







