'हे दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत...,' जय पवारांना भर सभेत अश्रू अनावर, कार्यकर्तेही रडले, VIDEO
- Published by:Sachin S
- Reported by:JITENDRA JADHAV
Last Updated:
काहीजण म्हणाले दादा असते तर रात्रीच सगळं करून टाकलं असतं. मी नवीन आहे, मी हळूहळू करेल. शिकतोय मी,
बारामती : "ही बारामती दादांची आहे तुमच्यामुळे दादा होते, 28 तारखेला थोडसं रडलो, हे दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबणार नाही. मी कुटुंबासमोर रडू नाहीतर कुणासमोर रडू" असं म्हणत दिवगंत नेते अजित पवार यांच्या चिरंजीव जय पवार यांना अश्रू अनावर झाले. बारामतीमध्ये पहिल्यांदाच जय पवार यांचं भावुक भाषण ऐकून उपस्थितीत कार्यकर्त्यांनाही रडू कोसळलं.
आगामी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांसोबत आढावा बैठक पार पडली. यावेळी जय पवार यांचं भाषण ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
"ही बारामती दादांची आहे तुमच्यामुळे दादा होते, 28 तारखेला थोडसं रडलो हे दादांचा रक्त आहे, शेवटपर्यंत थांबणार नाही.दादा आपल्यात नसतील पण दादा आपल्या हृदयात आहे, जय पवार बोलताना भावनिक झाले त्यावेळेस कार्यकर्ते म्हणाले, 'दादा रडू नका' त्यावर जय पवार म्हणाले, 'मी तुमच्यासमोर रडू, नाहीतर कुणासमोर रडू. निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे बारामतीकरांनी ठरवलेला आहे. बारामतीमध्ये विकास काम दिसत आहेत, ती दादांमुळे आहेत, साहेबांमुळे आहेत' असं म्हणत जय पवार यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
advertisement
जिरायत हा शब्द दादांनी काढून टाकला. मी आज पाहणी करण्यासाठी गेलो होतो तिथं काहीजण म्हणाले दादा असते तर रात्रीच सगळं करून टाकलं असतं. मी नवीन आहे, मी हळूहळू करेल. शिकतोय मी, अनेक काम सध्या विकास काम सुरू आहेत. दादांनी नियोजन करून काम ठेवली होती, दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेले. दादांचे स्वप्न पूर्ण करायला मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे. एमआयडीसी आपल्याला वाढवायचे आहे. 28 जानेवारी हा आपल्यासाठी काळा दिवस होता. मला अजूनही विश्वास बसत नाही कधी कधी वाटतं, मला दादा दौऱ्यावरून परत येतील फोन येईल, मला तुमच्या सगळ्यांमध्ये दादा दिसतात, असंही जय पवार म्हणाले.
advertisement
'मी बोललो तर तपास यंत्रणांना धक्का पोहोचतो, त्याच्यामुळे मी बोलत नाही'
"सीआयडीने माझं रक्त घेतलं डीएनए चेक करायला. ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी मी डीवायएसपी यांना सांगितलं होतं काही करून मला ब्लॅक बॉक्स पाहिजेत दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले. कारवाई होऊ द्या, सगळं अहवाल येऊ द्या, मग आपण बोलू माझे जे मुद्दे होते, ते रोहित दादांनी आधीच सांगितले आहेत मग मी परत बोलायचं का? अपघात की घातपात मला माहित नाही. ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहित आहे. मी पण एक रोहित सिंगचा व्हिडिओ टाकला त्याबाबत लिहिलं. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करा. वहिनींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, सीबीआयला सांगितलंस चौकशी करा आपण सगळे व्यवस्थित करू. मी बोललो तर तपास यंत्रणांना धक्का पोहोचतो त्याच्यामुळे मी बोलत नाही, तपासणी यंत्रणेला त्यांच्या हिशोबाने कारवाई करू द्या मला सगळं माहित आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 10:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'हे दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत...,' जय पवारांना भर सभेत अश्रू अनावर, कार्यकर्तेही रडले, VIDEO









