चिंचवड रेल्वे स्टेशनवर वृद्ध व्यक्तीचं अजब कांड; खिसा तपासताच पोलीसही चक्रावले, लगेचच अटक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जवाहर अर्जुनदास रामनानी (वय ६८, रा. पिंपरी) या वृद्धाला पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई केली आहे. जवाहर अर्जुनदास रामनानी (वय ६८, रा. पिंपरी) या वृद्धाला पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. जवाहर या परिसरात गांजाची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आला होता. शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशनजवळ एक व्यक्ती अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित जवाहर रामनानी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलीसही हैराण झाले. त्याच्याकडे ६ किलो ५५ ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक मोबाईल असा एकूण ३ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला.
advertisement
हवालदार विशाल शिवाजीराव गायकवाड यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेला ६८ वर्षीय वृद्ध इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणत होता आणि तो कोणाला विकणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या गुन्ह्यामागे एखादे मोठे अमली पदार्थ विक्रीचे जाळे कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आपली गस्त आणि गुप्त माहिती संकलन यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 6:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
चिंचवड रेल्वे स्टेशनवर वृद्ध व्यक्तीचं अजब कांड; खिसा तपासताच पोलीसही चक्रावले, लगेचच अटक







