अलीकडेच सलीम खानचा मुलगा आणि सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खान याने याबाबत सांगितलं. अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खानने सांगितलं की त्याचे कुटुंब सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि ते सलमानच्या सुरक्षिततेबद्दल काय विचार करत आहेत.
'...तर सलमानला माफ करू', बिष्णोई समाजाने भाईजानसमोर ठेवलीये कोणती अट?
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकीच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आणि सलमान खानसोबत असलेल्या लोकांचं काय होईल, अशी धमकीही दिली. मात्र, या धमकीनंतर बॉलिवूड सुपरस्टार्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र सलमानचे संपूर्ण कुटुंब त्याच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे.
advertisement
'प्रत्येकजण चिंतेत आणि काळजीत आहे' अरबाज खानने 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सलमान खानला सुरक्षित ठेवण्यासाठी तो आणि संपूर्ण कुटुंब काय करत आहेत. अरबाज म्हणाला, 'आम्ही ठीक आहोत, मी असं म्हणणार नाही की आम्ही पूर्णपणे ठीक नाही आहोत, कारण सध्या कुटुंबात बरेच काही घडत आहे. प्रत्येकजण चिंतेत आहे.' सलमानच्या सुरक्षेबाबत तो म्हणाला, 'आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत. सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण आणि आम्ही हे देखील सुनिश्चित करत आहोत की गोष्टी जशा व्हाव्यात आणि सलमान सुरक्षित राहील.
आधी सलमानच्या घरावर गोळीबार, मग सलीम खानला धमकी या वर्षी एप्रिलमध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबार केला होता. यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांनाही धमकी देण्यात आली होती.
लॉरेन्स बिश्नोईने घोषणा केली होती- सलमानकडून बदला घेतला जाईल 2018 साली लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानने शिकार केलेल्या काळवीटाचा बदला घेणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून तो अभिनेत्याच्या मागे लागला आहे.
