advertisement

'...तर सलमानला माफ करू', बिष्णोई समाजाने भाईजानसमोर ठेवलीये कोणती अट?

Last Updated:
salman khan bishnoi controversy : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात लॉरेन्स बिष्णोई गँगचं नाव समोर आल्यामुळे पुन्हा एकदा अभिनेता सलमान खान आणि बिष्णोई समाज चर्चेत आला आहे. लोकल 18 सोबत खास बातचित करताना अखिल भारतीय बिष्णोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
1/9
 जर सलमान खानने माफी मागितली तर बिष्णोई समाज त्याला माफ करेल, पण यासाठी सलमानने स्वत: येऊन चूक कबूल करून माफी मागावी. यानंतर बिष्णोई समाजातील न्यायनिवाडा करणारे एकत्र बसतील आणि 29 नियमांनुसार माफ करतील, असं देवेंद्र बुडिया म्हणाले आहेत.

2/9
 1998 साली हम साथ साथ है च्या शुटिंगवेळी सलमान खानसह काही बॉलिवुड सेलिब्रिटींनी काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे, पण या घटनेमुळे बिष्णोई समाज सलमान खानविरोधात आहे.

3/9
 बाबा सिद्दिकी सलमान खानच्या जवळचे होते आणि त्यांच्या हत्या प्रकरणात बिष्णोई गँगचं नाव समोर येत आहे. सलमानच्या घरावरही काही महिन्यांपूर्वी बिष्णोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता.

4/9
27 वर्ष जुन्या प्रकरणात बिष्णोई समाज सलमानला काही अटींसह माफ करू शकतो, असं अखिल भारतीय बिष्णोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी सांगितलं आहे.

5/9
"बिष्णोई समाजाच्या 29 नियमांमधल्या 10व्या नियमात चुकीला माफ करण्याचं प्रावधान आहे. आमचे धर्मगुरू जंभेश्वर यांनी 29 नियम बनवले आहेत. जर कुणी अपराध केला असेल आणि त्याने याबद्दल माफी मागितली तर त्याला माफ केलं जाऊ शकतं, हे प्रावधान नियमांमध्ये आहे."

6/9
 "बिष्णोई समाज कधीच कुणाचं नुकसान करत नाही, जर कुणी क्षमेच्या भावनेने येत असेल तर समाजातले प्रतिष्ठित लोक बसून त्या व्यक्तीला माफ करतात", असं देवेंद्र बुडिया म्हणाले आहेत.

7/9
बिष्णोई समाजाचे महिपाल बिष्णोई यांना ऑक्टोबर 1998 साली घडलेली ही घटना अजूनही आठवत आहे. ‘जोधपूरच्या कांकाणी गावात रात्री 2 वाजण्याच्या सुमारास गोळी चालवण्याचा आवाज झाला होता. गावात असलेल्या पूनमचंद आणि इतरांना गाडीमध्ये लाईट सुरू असल्याचं दिसलं, त्यामुळे त्यांना संशय आला.

8/9
यानंतर गावकरी लगेच घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तिकडे काळविटाची शिकार झाल्याचं त्यांना समजलं. एक जिप्सी तिथून गेल्याचं त्यांना दिसलं. सलमान खान जोधपूरमध्ये हम साथ साथ है चित्रपटाच्या शुटिंगला आला होता, तेव्हा तो आपल्या सहकाऱ्यांसोबत शिकारीला आला होता’, असा दावा महिपाल बिष्णोई यांनी केला आहे.

9/9
याप्रकरणी सलमान खानवर 4 गुन्हे दाखल आहेत, सध्या सलमान जामिनावर बाहेर आहे. 2006 आणि 2007 साली सलमानला याप्रकरणी काही दिवसांसाठी जेलमध्येही जावं लागलं होतं.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement