TRENDING:

Tejaswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ट्रिपल धमाका, 'येक नंबर' मध्ये तिहेरी भूमिकेत!

Last Updated:

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. ती वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ती प्रेक्षकांना ट्रिपल धमाका देणार असून ती तिहेरी भूमिकेत दिसणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. ती वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकतंच तिनं राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने लिखाण क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ती प्रेक्षकांना ट्रिपल धमाका देणार असून ती तिहेरी भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ट्रिपल धमाका
अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ट्रिपल धमाका
advertisement

‘येक नंबर’ या चित्रपटात निर्मिती आणि लेखनाव्यतिरिक्त ती अभिनय करतानाही दिसत आहे. तेजस्विनी यात पोलिसाच्या भूमिकेत झळकली असून पहिल्यांदाच ती या व्यक्तिरेखेत दिसत आहे. एकाचवेळी अशा तिहेरी भूमिकेत पाहणे, म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.

'कठीण काळातून जात आहे खान कुटुंब', सलमानचा भाऊ अरबाजने सांगितली सध्याची परिस्थिती

आपल्या या तिहेरी भूमिकेबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ‘‘लिखाणाची आवड पूर्वीपासून होतीच, फक्त आधी स्वतःपुरतं लिहायचे आता सिनेमासाठी लिहिलंय. खरंतर व्यक्त होणं गरजेचं असतं. काय व्यक्त होताय यावर प्लॅटफॉर्म ठरतो. मला हा विषय खूप मोठ्या स्केलवर दिसत होता म्हणून मी यावेळेला सिनेमा ह्या माध्यमामधून व्यक्त व्हायचं ठरवलं. मोठी जबाबदारी होती आणि प्रामाणिकपणे ती पार पाडायचा प्रयत्न केलाय. मला खात्री आहे प्रेक्षकांना माझी ही भूमिका सुद्धा आवडेल.’’

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘एक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Tejaswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा ट्रिपल धमाका, 'येक नंबर' मध्ये तिहेरी भूमिकेत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल