advertisement

'कठीण काळातून जात आहे खान कुटुंब', सलमानचा भाऊ अरबाजने सांगितली सध्याची परिस्थिती

Last Updated:

बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते. सलमान सोबत असलेल्या मैत्रीमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर केवळ भाईजानचे चाहतेच नाही तर संपूर्ण खान कुटुंब भयभीत झालं आहे.

'कठिण काळातून जात आहे खान कुटुंब'
'कठिण काळातून जात आहे खान कुटुंब'
मुंबई : Ncp नेता बाबा सिद्दीकीची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. या हत्येनं संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच या हत्येनं मोठा धक्का बसला. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते. सलमान सोबत असलेल्या मैत्रीमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर केवळ भाईजानचे चाहतेच नाही तर संपूर्ण खान कुटुंब भयभीत झालं आहे.
अलीकडेच सलीम खानचा मुलगा आणि सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खान याने याबाबत सांगितलं. अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खानने सांगितलं की त्याचे कुटुंब सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि ते सलमानच्या सुरक्षिततेबद्दल काय विचार करत आहेत.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकीच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आणि सलमान खानसोबत असलेल्या लोकांचं काय होईल, अशी धमकीही दिली. मात्र, या धमकीनंतर बॉलिवूड सुपरस्टार्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र सलमानचे संपूर्ण कुटुंब त्याच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे.
advertisement
'प्रत्येकजण चिंतेत आणि काळजीत आहे' अरबाज खानने 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सलमान खानला सुरक्षित ठेवण्यासाठी तो आणि संपूर्ण कुटुंब काय करत आहेत. अरबाज म्हणाला, 'आम्ही ठीक आहोत, मी असं म्हणणार नाही की आम्ही पूर्णपणे ठीक नाही आहोत, कारण सध्या कुटुंबात बरेच काही घडत आहे. प्रत्येकजण चिंतेत आहे.' सलमानच्या सुरक्षेबाबत तो म्हणाला, 'आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत. सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण आणि आम्ही हे देखील सुनिश्चित करत आहोत की गोष्टी जशा व्हाव्यात आणि सलमान सुरक्षित राहील.
advertisement
आधी सलमानच्या घरावर गोळीबार, मग सलीम खानला धमकी या वर्षी एप्रिलमध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबार केला होता. यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांनाही धमकी देण्यात आली होती.
लॉरेन्स बिश्नोईने घोषणा केली होती- सलमानकडून बदला घेतला जाईल 2018 साली लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानने शिकार केलेल्या काळवीटाचा बदला घेणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून तो अभिनेत्याच्या मागे लागला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कठीण काळातून जात आहे खान कुटुंब', सलमानचा भाऊ अरबाजने सांगितली सध्याची परिस्थिती
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement