TRENDING:

Vandana Gupte: पावसामुळे अपघात, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंना इजा; नाटकाचे प्रयोगही करावे लागले रद्द

Last Updated:

Vandana Gupte: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील एक लोकप्रिय आणि अनुभवी नाव आहे. मात्र सध्या पावसामुळे त्यांचा अपघात झाल्याचं समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील एक लोकप्रिय आणि अनुभवी नाव आहे. त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी आणि विनोदी भूमिकांसाठी त्या विशेष ओळखल्या जातात. मात्र सध्या पावसामुळे त्यांचा अपघात झाल्याचं समोर येत आहे. ज्यामुळे त्यांचे नाटकाचे प्रयोगही रद्द झाले आहेत.
पावसामुळे अपघात, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंना इजा
पावसामुळे अपघात, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंना इजा
advertisement

वंदना गुप्तेंना काय झालं?

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा लोकप्रिय नाटक कुटुंब कीर्तन हाऊसफुल चालू असताना दोन प्रयोग अचानक रद्द झालेत. याचं कारण म्हणजे पावसामुळे झालेला त्यांचा अपघात. वंदना गुप्ते यांचा पाय जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्यात पाय घसरल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. चालतानाही त्रास होतोय. त्यामुळे पुण्याचा बालगंधर्व नाट्यमंदिर (18 सप्टेंबर) आणि बोरीवली (19 सप्टेंबर) येथील प्रयोग रद्द करावे लागले.

advertisement

'ये तो गरिबोंका खाना', मराठी जेवणाला विवेक अग्निहोत्रीने नावं ठेवली! Video

वंदना गुप्ते यांनी स्वतः त्यांच्या चाहत्यांना ही बातमी सोशल मीडियाद्वारे दिली. त्यात त्यांचा लाडका नातू रियानही दिसला. "मी प्रेक्षकांची माफी मागते, ही माझ्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे," असं त्यांनी सांगितलं. त्याच वेळी नातवाने कॅमेऱ्यासमोर आजीला लवकर बरी व्हा अशी गोड शुभेच्छा दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

कुटुंब कीर्तन हे नाटक अल्पावधीतच घराघरात पोहोचलं आहे. संकर्षण कऱ्हाडे आणि तन्वी मुंडले यांच्या दमदार अभिनयासोबतच वंदना गुप्ते यांची रंगमंचावरील उपस्थिती हे या नाटकाचं मुख्य आकर्षण आहे. म्हणूनच दोन प्रयोग रद्द झाल्याने प्रेक्षकांमध्ये निराशा आहे, पण त्याहून मोठी काळजी वंदना ताईंच्या प्रकृतीबद्दल व्यक्त होतेय.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Vandana Gupte: पावसामुळे अपघात, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंना इजा; नाटकाचे प्रयोगही करावे लागले रद्द
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल