advertisement

Vivek Agnihotri : 'ये तो गरिबोंका खाना', मराठी जेवणाला विवेक अग्निहोत्रीने नावं ठेवली! Video

Last Updated:

Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता आहेत. सध्या ते त्यांचा आगामी सिनेमा ‘द बंगाल फाइल्स’मुळे चर्चेत आहेत.

महाराष्ट्रीयन जेवणावर विवेक अग्निहोत्रींची शॉकिंग रिअॅक्शन
महाराष्ट्रीयन जेवणावर विवेक अग्निहोत्रींची शॉकिंग रिअॅक्शन
मुंबई : विवेक अग्निहोत्री हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता आहेत. सध्या ते त्यांचा आगामी सिनेमा ‘द बंगाल फाइल्स’मुळे चर्चेत आहेत. याचदरम्यान त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रीयन जेवणाला गरिबांचं जेवण म्हटलं. ज्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. या व्हायरल व्हिडीओमध्ये विवेक अग्निहोत्री नेमकं काय म्हणाले?
विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी नुकतीच Curly Tales ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दोघांनी जेवणाच्या सवयींविषयी सांगितलं. याच वेळी विवेक यांनी सुरुवातीला महाराष्ट्रीयन जेवणाविषयी त्यांची काय रिॲक्शन होती? याविषयीदेखील सांगितलं.
पल्लवी जोशी महाराष्ट्रीयन असल्यामुळे लग्नानंतर त्यांनी विवेकला महाराष्ट्रीयन जेवण खाऊ घातलं. मात्र ती म्हणाली, 'विवेक मला सतत म्हणायचा की काय हे गरिबांचं जेवण आहे'. यावर उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, "मी दिल्लीचा होतो त्यामुळे मला कबाब, मटण, चिकन, जेवणात मसाला, तूप याची सवय होती. तर ही मला म्हणायची, 'वरण भात खा, कढी खा', मराठी लोकांचं जेवण हेल्थफुल असतं. ते पाहून मला कल्चर शॉक लागला."
advertisement
दरम्यान, 1990 च्या दशकात, एका टीव्ही प्रोजेक्टसाठी विवेक आणि पल्लवीची भेट झाली होती. सुरुवातीला ही नुसतीच प्रोफेशनल भेट झाली होती. पण काम करताना दोघांच्या विचारांत एक वेगळी जुळवाजुळव दिसू लागली. विवेकला पल्लवीचं शांत स्वभाव, स्थिरता आणि तिचं कामावरील प्रेम खूप भावलं. तर पल्लवीला विवेकचा धाडसी, नेहमी वेगळं करण्याचा हट्ट असलेला स्वभाव आवडू लागला. काही काळ त्यांनी एकमेकांना चांगलं ओळखून घेतलं. फार गाजावाजा न करता, दोघांनी त्यांचं नातं खूप प्रायव्हेट ठेवलं. आज ते मस्त संसार एन्जॉय करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vivek Agnihotri : 'ये तो गरिबोंका खाना', मराठी जेवणाला विवेक अग्निहोत्रीने नावं ठेवली! Video
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement