TRENDING:

मुंबईतील मार्गाला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं नाव, मुलगा म्हणाला, 'हा स्वप्नपूर्तीचा क्षण'

Last Updated:

मुंबईतील एका रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. नुकताच या संबंधिचा कार्यक्रम पार पडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: तब्बल सहा दशके मराठीसह हिंदी मनोरंजन विश्व गाजवलेले अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व रमेश देव यांची ९६ वी जयंती ३० जानेवारीला पार पडली. रमेश देव यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना खास आदरांजली देण्यात आली आहे. अंधेरी येथील वर्सोवा परिसरातील एका रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. नुकताच या संबंधिचा कार्यक्रम पार पडला आहे.
मुंबईतील एका रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. नुकताच या संबंधिचा कार्यक्रम पार पडला आहे.
मुंबईतील एका रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. नुकताच या संबंधिचा कार्यक्रम पार पडला आहे.
advertisement

रमेश देव यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांचं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. अशा या महान कलाकाराला आदरांजली देण्यासाठी आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

advertisement

काम एकाचं अन् कौतुक भलत्याचंच! 'पाताल लोक'च्या लिखाणावर अभिनेता स्पष्टच बोलला, 'मला क्रेडिट...'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

याप्रसंगी बोलताना रमेश देव यांचे पुत्र अभिनेते अजिंक्य देव म्हणाले, ‘आज संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा स्वप्नपूर्तीचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज बाबांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. बाबांच्या नावाचा मार्ग झाला याचा खूप आनंद झाला आहे. हे बाबांचे आशीर्वाद आहेत. याचा त्यांना ही निश्चितच आनंद झाला असेल.' याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
मुंबईतील मार्गाला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं नाव, मुलगा म्हणाला, 'हा स्वप्नपूर्तीचा क्षण'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल