काम एकाचं अन् कौतुक भलत्याचंच! 'पाताल लोक'च्या लिखाणावर अभिनेता स्पष्टच बोलला, 'मला क्रेडिट...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Paatal Lok Season 2: 'पाताल लोक' सीरीजच्या लेखकाचं नाव समोर आलं तेव्हा अभिषेक बॅनर्जीचं नाव या वेबसीरीजसह जोडलं गेलं.
Paatal Lok Season 2: 'पाताल लोक' सीरीजच्या लेखकाचं नाव समोर आलं तेव्हा अभिषेक बॅनर्जीचं नाव या वेबसीरीजसह जोडलं गेलं. अभिषेकच्या अनेक चाहत्यांना हे नाव वाचल्यानंतर वेबसीरीजचं लेखन अभिषेकनेच केलं असल्याचं वाटलं. यापूर्वी अभिनेत्याने या सीरीजच्या पहिल्या सीजनमध्ये 'हथौड़ा त्यागी' ही भूमिका साकारली होती. त्यामुळे अभिषेकच्या चाहत्यांना तो सीरीजच्या दुसऱ्या सीजनमध्ये लेखनाची धुरा सांभाळत असल्याचा गैरसमज झाला. परंतू खरतर हे सत्य नसून इंडस्ट्रीमध्ये एकाच नावाची दोन माणसं असल्याने हा गैरसमज झाला की अभिषेकने 'पाताल लोक' या सीरीजच्या दुसऱ्या भागासाठी लेखन केलं आहे.
advertisement
परंतू अभिषेक बॅनर्जीने याविषयी भाष्य केलं आहे. अभिनेता म्हणाला बॉलिवूडमध्ये आता दोन अभिषेक आहेत, एक जो लिहितो आणि दुसरा जो अभिनय करतो. पुढे अभिनेता म्हणाला कृपया तुम्ही खऱ्या लेखकाला क्रेडिट द्या, ही त्यांची मेहनत आहे. मी अभिनेता आहे आणि तो अभिषेक बॅनर्जी लेखक आहे. अभिनेत्याने यावर पुढे स्पष्ट भाष्य केलं असून म्हटलं आहे की मी कधी काही लिहू शकत नाही कारण माझ्याकडे एका लेखकाकडे असलेली नजर नाही आणि जर मी काही लिहिलच तर मी माझ्या ऑडिशनच्या आधीच रिजेक्ट होइन. त्यामुळे कधीही काही चांगलं लिहिलेलं आढळलं तर तो अभिषेक बॅनर्जी मी नकीच नसेन.
advertisement
दरम्यान अभिनेता अभिषेक बॅनर्जी व लेखक अभिषेक बॅनर्जी हे दोघे एकमेकांचे जुने मित्र असून अभिनेत्याने याबद्दल बोलताना सांगितलं की इंडस्ट्रीत स्ट्रगल करत असताना मी अभिषेकला म्हणालो होतो की तू तुझं नाव बदलं कारण जर पुढे जाऊन माझं मोठं नाव झालं तर तू जे काही लिहिलं असेल त्यासाठी लोक मलाच क्रेडिट देतील आणि आता अभिनेत्याचं हे वाक्य खरं झाल्याचं पाहायाला मिळतंय.
advertisement
अभिषेक बॅनर्जीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'मिर्झापूर' या वेब सीरीजवर आधरित आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त तो मैडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिवर्स या प्रॉजेक्टचाही भाग असणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सूक्ता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2025 10:08 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
काम एकाचं अन् कौतुक भलत्याचंच! 'पाताल लोक'च्या लिखाणावर अभिनेता स्पष्टच बोलला, 'मला क्रेडिट...'







