advertisement

कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा अपघातात जागीच मृत्यू, भरधाव ट्रकनं चिरडलं; नांदेड हादरलं

Last Updated:

भरधाव हायवा ट्रकने त्यांना चिरडल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

News18
News18
नांदेड :  नांदेड जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद  बातमी समोर आली आहे. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा दूर करणारे ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. एका भरधाव हायवा ट्रकने त्यांना चिरडल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून, यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
नांदेड शहरातील सिडको परिसरात मंगळवारी सायंकाळी एका भीषण अपघातात मराठा सेवा संघाच्या संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर (रा. बारूळ, ता. कंधार) यांचा जागीच मृत्यू झाला. समाजप्रबोधनासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे अपघाती अंत झाल्याने नांदेड जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमका कसा झाला अपघात? 

advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर महाराज हे सिडको परिसरात आयोजित वारकरी परिषदेच्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आले होते. ही बैठक आटोपून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने मूळ गावी बारूळकडे जाण्यास निघाले. सिडकोतील रुबी हॉटेलजवळ आले असता पाठीमागून आलेल्या एका भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महाराज ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement

गर्दीचा फायदा घेत ट्रकचालक फरार

नांदेड शहरात जड वाहतुकीवर बंदी असतानाही सिडको भागात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकची दिवसभर मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. याच अनियंत्रित जड वाहतुकीने आज एका थोर कीर्तनकाराचा बळी घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर लग्नकार्याच्या गर्दीचा फायदा घेत ट्रकचालक फरार झाला असून ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
advertisement

कोण आहेत मधुकर महाराज?

मधुकर महाराज हे केवळ कीर्तनकार नव्हते, तर ते एक समाजसुधारक होते. वारकरी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघटनात्मक काम केले होते. आपल्या कीर्तनातून त्यांनी नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलन आणि युवकांच्या सक्षमीकरणावर भर दिला होता. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा अपघातात जागीच मृत्यू, भरधाव ट्रकनं चिरडलं; नांदेड हादरलं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement