झी मराठीवर नुकतीच 'पारू' ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार ७;३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. स्टार प्रवाह’वरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील पिंकी म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता प्रसाद जवादे ‘पारू’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. मालिकेला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. नुकतंच मालिकेत दाखवलेल्या काही सीन्सवर प्रेक्षक भडकले आहेत. सोशल मीडियावर कमेंट करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
आजोबा माजी CM तर वडील 5 वेळा आमदार; अभिनेता व्हिलन बनून देतोय बॉलिवूडच्या हिरोना टक्कर
मालिकेच्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या भागात मालिकेतील अहिल्यादेवी यांनी पारूच्या कानाखाली मारल्याचं दाखवलं होतं, त्यानंतर काल दाखवलेल्या एका सीनमध्ये मालिकेचा मुख्य नायक आदित्यने एका साध्या गोष्टीमुळं एका पार्टीत सगळ्यांसमोर पारूच्या कानाखाली मारल्याचं दाखवलं आहे. एवढंच नाही तर त्यानंतर कोणीच काही बोललं नाही, पारूचे वडीलही शांत बसून अन्याय सहन करताना दाखवले आहेत. तर पारूही काही बोलत नाही. मालिकेतील हाच सीन पाहून प्रेक्षक संतापले आहेत.
झी मराठीने तुम्हाला ही मालिका आवडली का? अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली होती. त्या खालीच कमेंट करत प्रेक्षकांनी 'एवढं कोण बेअक्कल असतं आजकाल...... वेडा लेखक कोणत्या जमान्यात वावरतोय', 'महा फालतू, भिकार सिरीयल', 'हे सीन आम्ही आधीही बऱ्याचदा पाहिलेत, लेखकाकडे नवीन काही नाही का?', 'या मालिकेत बघावं तेव्हा पारूच्या कानाखाली मारतात', 'फालतू टाकत जाऊ नका', 'बकवास', 'दोन दिवसातच नकोशी झाली मालिका...लवकर बंद करा', 'मालिकेत मुख्य नायकच तिच्या कानाखाली मारतोय, असे सीन्स दाखवत जाऊ नका' अशा कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.
आता प्रेक्षकांच्या या संतप्त प्रतिक्रियांनंतर मालिकेच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल होणार का, मालिकेचा टीआरपी घटणार की वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
