TRENDING:

Goa Night Club Fire: सिलेंडर नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे नाईट क्लब पेटला? 25 जणांचा हकनाक मृत्यू, धक्कादायक खुलासा समोर

Last Updated:

प्राथमिक माहितीनुसार, किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट घडून ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या आगीच्या दुर्घटनेबद्दल धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शनिवारी मध्यरात्री गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची बातमी समोर येताच संपूर्ण देश हादरला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
News18
News18
advertisement

प्राथमिक माहितीनुसार, किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट घडून ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या आगीच्या दुर्घटनेबद्दल धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट नसून 'हुक्का' किंवा 'मेणबत्त्या' असल्याची माहिती समोर आली आहे. डान्स बारमधील नर्तिकांच्या हातातील कॅन्डल्स किंवा हुक्क्याच्या ठिणगीमुळे हॉटेलच्या सुक्या झावळ्यांनी (छताने) पेट घेतला. यातून ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

advertisement

आगीचा भडका उडाल्यानंतर क्लबमध्ये गोंधळ निर्माण झाला. ही बाब किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही. क्लबमध्ये आग भडकल्याचं समजेपर्यंत किचनमधून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. त्यांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रशासन यंत्रणा खरी माहिती लपवत असून सिलेंडर स्फोटाचे कारण पुढे करत असून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

advertisement

गोव्यात घडलेल्या भीषण अग्नितांडवात २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. सुरुवातीला या दुर्घटनेचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, 'न्यूज १८ लोकमत'च्या हाती लागलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, हे कारण चुकीचे असून प्रशासन सत्य लपवत असल्याचा संशय आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आयटीतील नोकरी सोडली, आता आनंद विकतायत पोहे, महिन्याला 3 लाखांची उलाढाल
सर्व पहा

ज्यावेळी हॉटेलच्या सुक्या झावळ्यांनी (छताने) अचानक पेट घेतला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. या अचानक उद्भवलेल्या गोंधळात आणि धावपळीत काहीजण किचनच्या दिशेनं पळाले. त्यामुळे ते देखील किचनमधील कर्मचाऱ्यांसोबत आगीत होरपळून मृत पावले. एकीकडे ही धक्कादायक माहिती समोर येत असताना, प्रशासन मात्र अजूनही सिलेंडर स्फोटाचा दावा करून लोकांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/गोवा/
Goa Night Club Fire: सिलेंडर नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे नाईट क्लब पेटला? 25 जणांचा हकनाक मृत्यू, धक्कादायक खुलासा समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल