अंबरनाथ पश्चिमेतल्या भेंडीपाडा परिसरामध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय प्रतिक्षा राणे या तरूणीने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. M.Com पर्यंत शिकलेल्या प्रतिक्षाला सरकारी नोकरीमध्ये आवड होती. त्यामुळे तिने पोलीस भरतीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. पोलीस विभागातल्या भरतीदरम्यान, ग्राऊंड परीक्षेमध्ये प्रतिक्षाची निवड न झाल्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. तरूणीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये कारण स्पष्ट केलं होतं. प्रतिक्षाच्या जाण्याने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून अंबरनाथ शहरावर शोककळा पसरली आहे.
advertisement
प्रतिक्षाने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, "मला माझ्या आई- वडिलांना सरकारी नोकरी लागल्यानंतर जे आयुष्य द्यायचं होतं, ते मला देता आलं नाही. मी 26 वर्षांची असूनही मला जीवनात काहीही कमावता आले नाही. खरंतर मला सरकारी नोकरीची फार आवड होती. त्या माध्यमातूनच मला माझ्या आई- वडिलांना चांगलं आयुष्य द्यायचं होतं. माझी भरती प्रक्रियेमध्ये निवड न झाल्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहे." इतकंच नाही तर, त्या तरूणीने सुसाईड नोटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या कुटुंबाची माफी सुद्धा मागितली आहे. प्रतिक्षाच्या इतक्या टोकाच्या निर्णयामुळे आई- वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
फक्त पोलीस भरतीमध्ये प्रतिक्षाची निवड न झाल्यामुळे तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीमध्ये जर तिला यश प्राप्त नाही झाले, तर इतरत्र कोणत्याही सरकारी नोकरीसाठीही ती अर्ज करू शकली होती. जर तिचं पोलीस होण्याचंच स्वप्न उराशी असेल, तर आता नाही तर पुढच्या वेळी सुद्धा ती भरतीमध्ये अर्ज करू शकली असती. पण प्रतिक्षाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने राणे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
