TRENDING:

Success Story : उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग? Video

Last Updated:

ज्ञानेश्वर हिप्परकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी केवळ 10 गुंठे शेतामध्ये उसामध्ये कोबीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : शेती परवडत नाही, अशी ओरड सध्या सगळीकडे ऐकायला मिळत असते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र नवा आदर्श निर्माण केला आहे. ज्ञानेश्वर हिप्परकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी केवळ 10 गुंठे शेतामध्ये उसामध्ये कोबीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. 40 दिवसांमध्ये कोबीच्या आंतर पिकातून ज्ञानेश्वरांना 90 हजार रुपये मिळणार आहेत तर उसातून 1 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाहूयात प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्‍वर हिप्परकर यांची ही यशस्वी शेती.
advertisement

कोरवली गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी 10 गुंठ्यामध्ये उसाची लागवड केली आहे. उसाची लागवड केल्यावर शेतामध्ये उरलेल्या मोकळ्या जागेमध्ये आंतरपीक म्हणून कोबीची लागवड केली होती. 10 गुंठ्यात कोबीची लागवड करण्यासाठी ज्ञानेश्वर हिप्परकर यांना 12 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला होता. एक कोबी दीड ते दोन किलोचा असून सध्या बाजारात 10 ते 15 रुपये किलो दराने एका कोबीची विक्री होत आहे. 40 दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कोबीच्या आंतरपीकातून ज्ञानेश्वर हिप्परकर यांना खर्च वजा करून जवळपास 90 हजार रुपयांचा नफा मिळणार आहे.

advertisement

Success Story : आंतरपीक शेती करावी तर अशी, 30 गुंठ्यात घेतली 5 पीक, 3 लाख कमाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग?
सर्व पहा

तसेच 10 गुंठ्यामध्ये ज्ञानेश्वरांनी उसाची देखील लागवड केली आहे तर एका वर्षानंतर 10 गुंठ्यातून 25 टन ऊस निघणार असून या उसातून देखील जवळपास 1 लाख रुपयांचे उत्पन्न हे हिप्परकर यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड जर केली असेल तर मोकळ्या जागेमध्ये कोबी, कोथिंबीर किंवा पालेभाज्यांचे आंतरपीक घेऊन अधिक उत्पन्न कमवता येते असा सल्ला आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल