चाळीस रुपयांचा वाद अन् वृद्धेचा थरकाप
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावर असलेल्या कस्तुरी प्लाझा येथून दावडी गावात जाण्यासाठी एका महिला आणि तिच्या नातेवाईकांनी रिक्षा केली होती. रिक्षा चालकाने सुरुवातीला 120 रुपये भाडे सांगितले होते त्यानंतर महिला आणि तिचे नातेवाईक त्यानुसार रिक्षात बसून दावडी येथे पोहोचले.
मात्र ठिकाणी पोहोचल्यानंतर चालकाने अचानक 40 रुपये अधिक मागितले आणि एकूण 160 रुपये घेतले. यावर महिलेने सुरुवातीला 120 रुपयेच ठरले होते,असे सांगितले. यामुळे रिक्षाचालक संतापला. ''एवढ्या लांब जायचे होते तर आधी स्पष्ट का सांगितले नाही?'' असे म्हणत त्याने वृद्ध महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
त्या नराधम चालकाला कधी मिळणार शिक्षा?
वाद वाढत गेल्यानंतर रिक्षाचालकाने संतापाच्या भरात त्या महिलेला जोराने ढकलून दिले. त्यामुळे महिला रस्त्यावर पडली. पडल्यामुळे तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. जादा भाडे मागणे आणि त्यावरून वृद्ध महिलेशी गैरवर्तन करणे यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर संबंधित रिक्षाचालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे
