TRENDING:

Shocking Incident : आई-वडिलांच्या भांडणाने मुलांचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; बदलापूरमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना

Last Updated:

Badlapur Crime : बदलापूरमध्ये पती-पत्नीतील सततच्या भांडणाने भीषण वळण घेत पत्नीचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेत दोन निरागस मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून आई-वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बदलापूर : पती-पत्नी हे एका कुटुंबाचा पूर्ण आधारस्तंभ असतात. दोघांमध्ये होणाऱ्या वादाचा परिणाम घरातील अन्य सदस्यांवर ही होत असतो. मात्र, बदलापूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे दोन निरागस चिमुकल्यांचे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे.
बदलापूरमध्ये पती-पत्नीच्या वादातून दोन चिमुकले पोरके
बदलापूरमध्ये पती-पत्नीच्या वादातून दोन चिमुकले पोरके
advertisement

काळजाचा ठोका चुकवणारी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना बदलापूरमध्ये राहत असलेल्या थोरात कुटुंबात घडली आहे. या कुटुंबात एक दाम्पत्यांसह दोन मुलांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी चंद्रकांत थोरात (वय47) आणि मयत महिला अश्विनी (वय38) या दाम्पत्यांच वाद सुरु होते. वारंवार हे वाद किरकोळ कारणांवरुन होत असत मंगळवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला.

advertisement

रागाच्या भरात होत्याचं नव्हतं झालं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

मंगळवारी ही दोघांमध्ये पुन्हा एका किरकोळ कारणावरुन वाद झाला. हा वाद पाहता पाहत वाढला की यात चंद्रकांतने रागाच्या भरात कंबरेच्या पट्ट्याने पत्नीचा गळा आवळला. या घटनेच पत्नीचा जागीच मृत्यू झाला. सध्या बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली आहे.

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking Incident : आई-वडिलांच्या भांडणाने मुलांचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; बदलापूरमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल